इंदोरीकर महाराज चांगले प्रबोधनकार

इंदोरीकर महारजांवर झालेल्या आरोपांचे ते उत्तर देतील, परंतु ते एक चांगले प्रबोधनकार आहेत. माझ्या मतदारसंघात त्यांना मी दोन वेळा कीर्तनासाठी घेवून गेलो होते, असे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इंदोरीकर महाराजांबाबत आपले मत व्यक्त केले.
indorikar maharaj is good preacher says hasan mushrif
indorikar maharaj is good preacher says hasan mushrif

नगर, ता. 21 ः इंदोरीकर महारजांवर झालेल्या आरोपांचे ते उत्तर देतील, परंतु ते एक चांगले प्रबोधनकार आहेत. माझ्या मतदारसंघात त्यांना मी दोन वेळा कीर्तनासाठी घेवून गेलो होते, असे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इंदोरीकर महाराजांबाबत आपले मत व्यक्त केले.

नगरला आज बैठकिनिमित्त मुश्रीफ आले होते. त्या वेळी बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या इंदोरीकर महाराज प्रकरणावर भाष्य केले.

फडणवीस, चंद्रकांत पाटलांना झटका
आघाडी सरकारबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीला धोका नाही. ते दीर्घकाळ टिकणार आहे. विखे पाटील सुद्धा परत येतील. पुन्हा येणार, या भ्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राहू नये. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने फडणवीस व चंद्रकांत पाटलांना मोठा झटका बसला आहे, असे ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com