indorikar on his controversial statement | Sarkarnama

मी काही संपणार नाही : इंदुरीकर महाराज 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मी कोणतेही वाक्य खोटे बोललेलो नाही. जे आहे ते ग्रंथातच आहे. त्याचाच आधार कीर्तनात घेतला आहे. माझ्या पदरचं काहीच नाही.- इंदुरीकर महाराज

नगर :  इतक्या मोठ्या कीर्तनात एखादे वाक्य चुकू शकते. पण आता आपली कॅपिसीटी संपली आहे. दोन दिवसांत वाद मिटला नाही तर सरळ फेटा खाली ठेवून शेती करायची, असा निर्धार निवृत्ती देशमुख महाराज (इंदुरीकर महाराज) यांनी केला आहे.

परळी (जि. बीड) येथे शुक्रवारी रात्री झालेल्या कीर्तनातून इंदुरीकर महाराजांनी या वादाबाबत आपण टोकाचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

एका कीर्तनातील त्यांच्या वाक्यामुळे इंदोरीकर महाराज वादग्रस्त ठरले आहेत. याबाबतची व्हिडिओक्लिप यूट्यूबच्या माध्यमातून व्हायरल झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळाबाबत इंदोरीकर महाराजांनी कीर्तनातून भाष्य केले. इतके वर्षे झाली मी कीर्तन करीत आहे. लोकांसाठी काय केले, याचं कुणालाच देणेघेणे नाही. काही लोकांनी मला कशात तरी अडकावयाचे आहे. मात्र मी कशातच सापडत नाही. त्यामुळेच असे प्रकरणे काढण्याचा उद्योग सुरू आहे. यूट्युब चॅनेलवाल्यांनी माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ दाखवून लाखो रुपये कमविले. त्यांच्या चॅनेलला लाईक्स मिळत आहेत. आमच्याच कीर्तनावर त्यांनी पैसै कमावयाचे आणि आमच्याच काड्या करायच्या, हे काही बरोबर नाही. त्यांनी कितीही मला संपविण्याचा डाव आखला, तर मी काही संपणार नाही, असे त्यांनी कीर्तनातून सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख