घुसखोरी थांबवा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, लष्करप्रमुख रावतांचा पाकला गंभीर इशारा 

घुसखोरी थांबवा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, लष्करप्रमुख रावतांचा पाकला गंभीर इशारा 

नवी दिल्ली : "" पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या घुसखोरीला प्रोत्साहन देणे थांबवावे; अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा गंभीर इशारा भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी आज दिला आहे. 

काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. बांगलादेशच्या निर्मितीमुळे पाकिस्तान भारताशी बदला घेत असेल, तर भारतीय जवान पाकिस्तानचे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही असेही ते म्हणाले. 

इन्फेंट्री दिवसानिमित्त इंडिया गेटवर अमर जवान ज्योति येथे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते आले होते. पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था पाहावी आणि मगच भारताशी तुलना करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. भारताविरुद्ध यश मिळू शकत नाही, हे पाकिस्तानला चांगले ठाऊक आहे. म्हणूनच काश्‍मीरच्या विकासात वारंवार अडथळे आणले जात आहेत. मात्र भारताकडे पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्यासाठी अनेक पर्याय आहेत आणि ते अमलात आणण्यासाठी आपण सक्षम आहोत असेही ते म्हणाले. 

काश्‍मीरमध्ये दगडफेक करणारे युवक हे "ओव्हर ग्राउंड वर्कर्स' आहेत. 25 ऑक्‍टोबर रोजी दगडफेकीत जवान राजेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. सीमेलगतच्या रस्तेकामात असलेल्या जवानाला दगडफेक करणाऱ्या युवकांमुळे जीव गमवावा लागला. तरीही दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक देऊ नये, असे काहींचे म्हणणे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com