India will never forget soldiers martyrdom says pm modi | Sarkarnama

जवानांचे हौतात्म्य देश विसरणार नाही - मोदी 

पीटीआय
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुलवामात गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या सुरक्षा जवानांचे हौतात्म्य देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरवरुन शुक्रवारी आदरांजली वाहिली. 

नवी दिल्ली - पुलवामात गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या सुरक्षा जवानांचे हौतात्म्य देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरवरुन शुक्रवारी आदरांजली वाहिली. 

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) वाहनावर गेल्या वर्षी दहशतवादी हल्ला झाला. यात ४० जवान हुतात्मा झाले. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त मोदी यांनी हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख