भारत मोदीमुक्त झाला पाहिजे : राज ठाकरे यांचा घणाघात

गुढीपाढव्यानिमित्त मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातरणशिंग फुंकले.प्रचंड संख्येने मनसैनिक या वेळी हजर होते. मनसे संपली, असे म्हणणाऱ्यांना ही गर्दी पाहून धडकी भरेल, असेही राज यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
भारत मोदीमुक्त झाला पाहिजे : राज ठाकरे यांचा घणाघात

पुणे : ``देशात राममंदिराच्या नावाखाली पुन्हा दंगली घडवल्या जातील. कोर्टाचा निकाल आला की दंगली सुरु होतील. राम मंदिर व्हायलाच पाहिजे मलाही ते हवंय. पण निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या नावाखाली दंगली होणार असतील तर मंदिर पुढच्या वर्षी निवडणुकांनंतर झाल्या तरी चालतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोेटे बोलत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदीमुक्त भारत झाला पाहिजे, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

गुढीपाढव्यानिमित्त मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. प्रचंड संख्येने मनसैनिक या वेळी हजर होते. मनसे संपली, असे म्हणणाऱ्यांना ही गर्दी पाहून धडकी भरेल, असेही राज यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यांच्याविरोधात एकत्र यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. मोदी आजार आपल्याला दूर करावा लागेल. नोटबंदी, जीएसटी लागू केले. ज्या गुजराती बांधवांनी मोदींना यश तिले. त्यांनाही मोदी निवडून आल्यानंतर त्रास झाला. 

सर्वच जण मोदींच्या कारभाराला कंटाळले आहेत. यासाठी मनसैनिकांना उभे राहावे लागेल. निवडणुकांसाठी नवीन तंत्र सुरू आहे. हे सरळ साधे सुरू नाही. लोकसभा निवडणुका या लवकर घेण्याचा विचार आहे. नोटबंदीची चौकशी झाली तर स्वातंत्र्यापासूनचा सर्वांत मोठा स्कॅम हा नोटाबंदीचा असेल, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकार परत आले तर अजून वाट लावतील, अशी टीका त्यांनी केली.   

``पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करू असं मोदी म्हणाले आणि नंतर निवडणुका जिंकल्यावर अमित शहा म्हणाले हा ‘ चुनावी जुमला ‘ आहे. तुम्ही मतदारांशी खेटो बोलता? फक्त शो सुरू आहे. देशात काहीच घडत नाही. लोकांना काय हवयं, ते यांना कळत नाही. देशात बोफोर्स नंतर मोठा घोटाळा होत आहे. बोफोर्सपेक्षा देखील सगळ्यात मोठा घोटाळा 'राफेल विमान' खरेदीचा आहे. राफेल विमानाची किंमत आहे ५५० कोटी आणि सरकारने फ्रान्स सरकारकडून १६०० कोटींना घेतली आहे. हा भ्रष्टाचार आहे, यावर कोणी बोलत नाही. हे काम कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स कंपनीला दिल गेलंय`` असा आरोप त्यांनी केला.

मुंबई बडोदा एक्प्रेस वे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधलं फायनान्शियल सेंटर हे गुजरातला हलवलं गेलं. या सगळ्यातून तुमच्या लक्षात येईल की मुंबई महाराष्ट्राला तोडण्याचा डाव सुरु आहे १९६० ला मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबई महाराष्ट्राला देऊ नका यासाठी नेहरूंवर वल्लभभाई पटेलांचा दबाव होता. तरीही मुंबई महाराष्ट्राला मिळाली याचा जो राग आहे त्यासाठी बुलेट ट्रेन हा प्रकल्प आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम बुलेट ट्रेन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com