indapur taluka will make ideal in state : Harshwardhan patil | Sarkarnama

इंदापूर तालुका राज्यात आदर्श बनविणार : हर्षवर्धन पाटील

संदेश शहा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

इंदापूर : इंदापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज आहे. मला प्रशासनात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनविणार आहे. भाजपप्रणीत महायुतीचा पहिला आमदार विजयी करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विक्रमी मताधिक्‍याने विजयी करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर : इंदापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज आहे. मला प्रशासनात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनविणार आहे. भाजपप्रणीत महायुतीचा पहिला आमदार विजयी करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विक्रमी मताधिक्‍याने विजयी करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.

महायुतीच्या 22 कलमी संकल्पनाम्याचे प्रकाशन हर्षवर्धन पाटील, भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे, रिपाइं आठवले गटाचे तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष नीलेश देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लालासाहेब पवार, भरत शहा, मंगेश पाटील, रघुनाथ राऊत, ऍड. मनोहर चौधरी, तुकाराम जाधव, अशोक घोगरे, दादासाहेब पिसे, अविनाश कोतमिरे, शकिलभाई सय्यद अशोक इजगुडे, राहुल जाधव, अमोल राजगुरू, सिकंदर बागवान उपस्थित होते.

पाटस ते पंढरपूर पालखी मार्ग भूसंपादन मोबदला प्रकिया पारदर्शी पद्धतीने केली जाईल. सुसज्ज ट्रॉमा सेंटर व हॉस्पिटल सुरू केले जाईल. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍याच्या विकासाचा अनुशेष भरला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, "शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी खडकवासला, भाटघर, उजनी, मुळशी तालुक्‍यातील टाटा प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन प्राधान्याने करण्यात येईल. नीरा डावा, खडकवासला कालवा विस्तारीकरण, नीरा व भीमा नदीवर बुडित बंधारे निर्माती, कृष्णा-नीरा-भीमा नदी स्थिरीकरण प्रकल्पातून पाच टीएमसी पाण्याचे नियोजन केले जाईल. उपलब्ध पाण्यात मत्स्यव्यवसायास चालना दिली जाईल. उजनी जलपर्यटन, कृषी व विधी महाविद्यालय सुरू करणे, लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणून बेरोजगारी दूर केले जाईल. द्राक्ष, केळी, डाळिंब व पालेभाजी प्रकिया उद्योग व शीतगृह उभारणी केली जाईल. तीर्थक्षेत्र पर्यटन वाढीस प्राधान्य दिले जाईल. शेती महामंडळ कामगारांना हक्काची घरे मिळवून दिले जातील. युवक, युवती व महिलांचे कौशल्यावर आधारित उद्योग उभारणी करून सक्षमीकरण केले जाईल.''

सूत्रसंचालन प्रचारप्रमुख ऍड. कृष्णाजी यादव यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख