इंदापूरात कोणाची कात्री चालणार? कोणाचे तिकिट कोण कापणार??

इंदापूरात कोणाची कात्री चालणार? कोणाचे तिकिट कोण कापणार??

वालचंदनगर :  एकमेकांचे गेल्या दहा वर्षांपासून कट्टर विरोधक असलेले आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येवून  रविवारी (ता. २३) रोजी खासगी मोबाईशॉपीच्या दुकानाचे कात्रीने फित कापून  उद्घाटन केले. दोघांनी एकाचवेळी कात्री हातामध्ये घेतल्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाच्या कात्रीने कोणाची उमेदवारी कट होणार, याकडे इंदापूर तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. 

इंदापुरातील गेल्या दोन विधानसभा निवडणुका या दोघांमध्येच लढल्या गेल्या. आता आगामी निवडणुकीत काॅंग्रेस आघाडीचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता असल्याने इंदापूरात या दोघांचे एकत्र येणे साहजिकच चर्चेचा विषय होतो. २००९ च्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमधून बंडखोरी करुन महाआघाडीच्या माध्यमातून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यामध्ये महाआघाडील अपयश आले. यांनतर २०१२ मध्ये भरणे यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झेडपी अध्यक्ष बनवून ताकद दिली.  भरणे यांनी २०१४ विधानसभा निवडणूकीमध्ये  आमदार भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा  पराभव करून जायंट किलर ठरले.

पाटील व भरणे एकमेकांवरती विकासकामावरुन टिकेची झोड उडवून देत आहेत. दोघांनी शासकीय कार्यक्रम वगळता एकत्र येण्याचे टाळले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी `राज्यामध्ये आघाडी नाही झाली तरी चालेल, मात्र इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही,`असे वक्तव्य करुन इंदापूरच्या जागेसंदर्भात पेच निर्माण केला होता. इंदापूरच्या जागेची चर्चा राज्यभर झाली.

मात्र  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये पवार कुंटूब व हर्षवर्धन पाटील यांची जवळील वाढली असून इंदापूर तालुक्यातुन खासदार सुप्रिया सुळे यांना ७० हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे पवार कुंटुंबाजवळ वजन वाढले असल्याने इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. आमदार भरणे हे विद्यमान आमदार असून त्यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. भरणे यांचे मुख्यमंत्री यांच्या भाजपमधील नेत्याचे सलोख्याचे संबध असल्यामुळे विरोधी पक्षाचे आमदार असतानादेखील भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणला आहे.

इंदापूर तालुक्यामधून हर्षवर्धन पाटील,आमदार भरणे, झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने हे तिघे तीव्र इच्छुक आहेत. येणाऱ्या निवडणूकीमध्ये कुणाच्या मतदाराला कोण कात्री लावून विधानसभेची जागा पटकावणार याकडे तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. 
--

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com