इंदापूरचे कॉंग्रेस भवन कॉंग्रेसचे नाहीच ; हर्षवर्धन पाटील यांचाही संबंध नाही : ऍड. कृष्णाजी यादव

इंदापूरचे कॉंग्रेस भवन कॉंग्रेसचे नाहीच ; हर्षवर्धन पाटील यांचाही संबंध नाही : ऍड. कृष्णाजी यादव

पुणे : "इंदापुरातील कॉंग्रेस भवनची इमारत इंदापूर तालुका कॉंग्रेस चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची असून त्या जागेशी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा काहीही संबंध नाही. ही इमारत बळकावण्यासाठी काहीजण पाटील यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचे मनसुभे पूर्ण होणार नाहीत'', असे ट्रस्टचे प्रवक्ते ऍड. कृष्णाजी यादव यांनी शनिवारी सांगितले. 

इंदापूर कॉंग्रेस भवनाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांसंदर्भात यादव यांनी ही माहिती दिली. यादव म्हणाले,"" माजी खासदार (कै.) शंकरराव पाटील यांच्या कार्यकाळात सन 1975-77 मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले असून तिचे शासकीय दप्तरी मालक व वहिवाटदार म्हणून इंदापूर तालुका कॉंग्रेस चॅरिटेबल ट्रस्ट अशी नोंद आहे. कॉंग्रेस भवन असे नाव असले तरी त्या इमारतीशी कॉंग्रेस, भाजप किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. ही इमारत मोक्‍याच्या जागी असल्याने काही उपद्रवी लोकांनी ती घशात घालण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामध्ये त्यांना यश मिळणार नाही. हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत ज्यांच्या मनात रोष आहे, ते अपप्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या इमारतीशी पाटील यांचाही काही संबंध नाही. ही इमारत ट्रस्टची आहे. इमारती जुनी असल्याने जीर्ण झाली आहे. तेथे वास्तव्य करणे किंवा कार्यालय चालवणे अशक्‍य असल्याने ट्रस्टने ती बंद केली आहे. ती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचे सर्व अधिकार इंदापूर तालुका कॉंग्रेस चॅरिटेबल ट्रस्टला आहेत. इमारतीपासून मिळणारे उत्पन्न सार्वजनिक ट्रस्टच्या नियमाप्रमाणे सार्वजनिक अथवा शैक्षणिक कामासाठीच वापरले जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com