इंदापूर व बारामती शेजारी आहे, म्हणून काय झाले ? 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे गणपतराव देशमुख, अनिल गोटे, भरणे, नारायणराव पाटील, राम शिंदे हे पाच आमदार निवडून आले होते. 1985 मध्ये ही संख्या नऊ होती.
bharne-ajitdada
bharne-ajitdada

केडगाव :  इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या विजयात 'बारामतीचा' वाटा असला तरी भरणे यांच्या मंत्रीपदाचा विचार करताना इंदापूर व बारामती शेजारी आहे. असा संबंध जोडू नये. समाज म्हणून भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी पुणे जिल्ह्यातून होत आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे गणपतराव देशमुख, अनिल गोटे, भरणे, नारायणराव पाटील, राम शिंदे हे पाच आमदार निवडून आले होते. 1985 मध्ये ही संख्या नऊ होती. यंदा भरणे यांना समाजाचे विधानसभेतील आस्तीत्व टिकवून ठेवण्यात यश आले आहे. 


भरणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यामुळे त्यांना  मंत्रीपद मिळावे अशी मागणी होते  आहे. भरणे यांच्या विजयाने समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या असून मंत्रीपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या दुस-या संभाव्य यादीत भरणे यांचे नाव नसल्याने उत्सुकता ताणली गेली आहे.


माजी आमदार गणपतराव देशमुख हे गेली 55 वर्ष राज्यातील धनगर समाजाचे प्रश्न सातत्याने विधीमंडळात मांडले राहिले. आता ही जबाबदारी भरणे यांच्यावर आली आहे. भरणे यांना मंत्रीपद दिले तर ते समाजाला राष्ट्रवादीकडे खेचू शकतात. त्यातून राष्ट्रवादीला आणखी एक ओबीसी चेहरा मिळू शकतो, असा दावा भरणे समर्थक करीत आहेत.  


पुणे जिल्ह्यात दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर हे तालुके धनगर बहुल आहेत. या चारही तालुक्यात समाज राष्ट्रवादीच्या बाजुने राहिल्याचे चित्र आहे. बारामतीमुळे भरणे यांना राज्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनगर समाजाची मते राष्ट्रवादीकडे टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला भरणे यांच्या रूपाने चालून संधी आली आहे, असे भरणे समर्थकांचे म्हणणे आहे . 


2014 ला धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजला. त्यास भाजपने हवा दिल्याने राज्यात त्यांचे सरकार आले. सत्तेवर आल्यावर भाजपने हात आखडता न घेता राम शिंदे व महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. तर डॅा. विकास महात्मे यांना खासदार केले. 


भाजप पाच वर्षात आरक्षण देऊ न शकल्याने समाजाची मते आघाडीकडे गेली. त्यामुळे आघाडीला अनपेक्षित जागा मिळाल्या. भाजपप्रमाणे राष्ट्रवादीने समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व द्यावे. अन्यथा समाज तुलना करेल, असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॅा.यशवंत खताळ यांनी व्यक्त केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com