भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षावर इन्कम टॅक्सची रेड

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व्यवहारांवर प्राप्तिकर विभागाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. नोटाबंदीनंतर अनेकांचे संशयास्पद व्यवहार रडारवर आले आहेत. त्यातून शिरूर तालुक्यातील राजकारण्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.
भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षावर इन्कम टॅक्सची रेड

शिक्रापूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांचे पुणे-हडपसर व कोरेगाव भिमा येथील मंगलमूर्ती वास्तू कंपनीच्या पाच कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने छापा टाकला.तब्बल 25 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी हा छापा टाकला. 24 तासांच्या तपासणीनंतरही ही कारवाई अद्यापही सुरू आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचेबरोबरच शिरुरच्या राजकारणात सक्रीय असलेल्या अनेक राजकारण्यांवर प्राप्तीकर खात्याने गेल्या दोन महिन्यात आपली नजर वळविल्याचे चित्र असून यात बांदल यांचेबरोबरच राष्ट्रवादीचा एक माजी उपसभापती, जिल्हा बॅंकेचे एक संचालक, एका नव्या दमाच्या नामांकित पहिलवानाचे वडील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष अशा सर्वांवर छापे करुन प्राप्तिकर खात्याने या सर्वांच्या व्यवहारांची चौकशी केली. 

शिवले हे फ्लॉटिंगच्या व्यवसायात सक्रिय असल्याचे सांगण्यात आले. मंगलमूर्ती वास्तू प्रा. लिमिटेड कंपनीद्वारे ते सक्रिय आहेत. तसेच भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदीही त्यांची वर्णी लागली. कोरेगाव-भिमा (ता.शिरूर), हडपसर (ता.हवेली) येथील प्रत्येकी एक तर चंदननगर (पुणे) येथील तीन कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. 


याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तीकर खात्याचे अतिरिक्त आयुक्त हितेंद्र निनावे, सहायक आयुक्त एस.के.आगल आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. शिवले यांचे सर्व व्यवहार, त्यांची सर्व बॅंक खाती, लॉकर्स आदींची कसून चौकशी चालू असून सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर खात्याचे वतीने कारवाईची माहिती खात्याकडून देण्यात येईल. दरम्यान याबाबत श्री शिवले यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. 

दरम्यान मंगलमूर्ती डेव्हलपर्स कंपनीवर प्राप्तिकर खात्याचे छापे पडताच चंदननगर, कोरेगाव-भिमा व शिक्रापूर येथील सर्व डेव्हलपर्सनी आपापली कार्यालये बंद ठेवल्याचे निदर्शनास आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com