imtiyaj jalil criticize on veer sarvarkar | Sarkarnama

इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांना नव्हे तर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या - इम्तियाज जलील

जगदीश पानसरे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : हा देश मोदी, शहा किंवा उध्दव ठाकरे यांच्या बोलण्यावर चालणार नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चालेल. या देशात अराजकता आणून एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात आहे. इंग्रजांची माफी मागणारे आणि आरएसएसच्या विचारांना मानणारे सावरकर यांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. पण या देशात भारतरत्नचे मानकरी कोण असतील ते लोकशाही अण्णाभाऊ साठे हे आहेत.

औरंगाबाद : हा देश मोदी, शहा किंवा उध्दव ठाकरे यांच्या बोलण्यावर चालणार नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चालेल. या देशात अराजकता आणून एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात आहे. इंग्रजांची माफी मागणारे आणि आरएसएसच्या विचारांना मानणारे सावरकर यांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. पण या देशात भारतरत्नचे मानकरी कोण असतील ते लोकशाही अण्णाभाऊ साठे हे आहेत. मी अजून चार वर्ष खासदार आहे, जेव्हा केव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी मला संसदेत भेटतील तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मातंग क्रांती मोर्चाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. 

सिल्लोड तालुक्‍यातील अंधारी येथील विवाहित महिलेला तिच्या घरात घुसून एका बारचालकाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. या घटनेत त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज मातंग क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढून विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी इम्तियाज जलील आले होते. अंधारी घटनेची माहिती कळताच मी संसदेत या विरोधात प्रश्‍न उपस्थित करून हिंगणघाट आणि अंधारी प्रकरणातील आरोपींविरुध्द फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फासावर लटकवा अशी मागणी केली होती. 

समाजातील अशा घटना रोखायच्या असतील तर आपपल्या भागातील दारूची दुकाने बंद करा हीच या मयत ताईला खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल. अंधारी येथील बारचालकानेच हे भयानक कृत्य केले होते, त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी दारू विक्रीवर बंदी आणली पाहिजे. देशात सध्या वेगळेच वातवरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देश आपल्या इशाऱ्यावर चालेल असे वाटत आहे. पण हा देश त्यांच्या धोरणांनुसार चालणार नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चालेल याचा पुनरुच्चार इम्तियाज जलील यांनी केला. सरकारे येतात, जातात, ते फक्त पाच वर्ष असतात, पण समाज वर्षानुवर्ष असतो. आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यायचा असेल तर आपण संघटित राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख