हातात सत्ता असताना गोटया खेळत होतात का? खासदार इम्तियाज जलील (व्हिडिओ)

भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून टीका केली आहे
Imtiaz Jalil Criticizm on Pankaja Munde
Imtiaz Jalil Criticizm on Pankaja Munde

औरंगाबाद : भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात पाच वर्ष सत्ता असताना तुम्ही गोटया खेळत होतात का, अशा शब्दात इम्तियाज यांनी भाजपच्या कालच्या उपोषणाला नौटंकी असे म्हटले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठवाड्याचा पाणी प्रश्नासह अन्य दहा मागण्यांसाठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले . या उपोषणाला माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मराठवाड्यातील भाजपचे आजी-माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. या उपोषणा संदर्भात इम्तियाज जलील म्हणाले,  ''मी विरोधी पक्षाचा खासदार आहे म्हणून उपोषणावर टीका करतोय असे नाही . तर अनेक सर्वसामान्य नागरिक देखील भाजपला पाच वर्षात तुम्ही काय केले, असा प्रश्न विचारत आहेत.''

''सत्तेत असताना काही करायचे नाही आणि सत्ता गेली की उपोषणा सारखी नाटकं करायची हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे .केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्हाला सगळं करणं शक्य होतं मग तेव्हा काय गोटया खेळत होतात का?'' असा सवालही इम्तियाज यांनी भाजपला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com