वंचित'ने वाढवली एमआयएमची चिंता : इम्तियाज जलील

यापुढे एकेक दिवस महत्वाचा आहे. एकेक दिवस पुढे जातो, तशी आमची काळजी वाढत आहे. उद्या आमचे एक प्रतिनिधी मंडळ प्रकाश आंबेडकरांचू भेट घेणार आहेत. मी स्वतः उद्या किंवा परवा जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असून त्यांना विनंती करणार आहे. -इम्तियाज जलील
Owaisi_Ambedkar_Imtiaz
Owaisi_Ambedkar_Imtiaz

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपांबाबत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये तोडगा निघत नसल्याने आमची चिंता वाढत असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. 

शिवाय जागावाटपांबाबत एमआयएम आणि वंचितच्या कोअर कमिटीची बैठक झाली, त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ३ दिवसात निर्णय देण्यात येणार असल्याचे सांगितले होते; मात्र १५ दिवस झाले तरी कोणताही निर्णय घेतला गेला नसल्याची खंतही खासदार जलील यांनी व्यक्त केली. 

'विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. त्यामध्ये एमआयएमचे अध्यक्ष अससोद्दीन ओवेसी, बाळासाहेब आंबेडकर आणि मी स्वतः उपस्थित होतो.

त्या बैठकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की तुम्ही कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार आहात त्याची यादी द्या. त्यावेळी ९८ जागांचा प्रस्ताव सर्वेक्षण करून वंचित बहुजन आघाडीकडे दिला होता. त्यापैकी ७६ जागांवर आम्ही निवडून येऊ शकतो असा विश्वास असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही', असं जलील म्हणाले. 

बाळासाहेबांनी सांगितले होते की, कोअर कमिटीसोबत बसून फायनल करा. त्यामुळे पंधरवाड्यापूर्वी वंचितच्या कोअर कमिटीसोबत औरंगाबादमध्ये आमची बैठक झाली. या बैठकीत तीन दिवसात निर्णय घेऊन सांगू असे सांगितले.

आता १५ दिवस झाले तरी निर्णय होत नसल्याने आमची चिंता वाढली आहे. आमचं म्हणणं असं आहे की, आमची यादी फायनल करा. तुम्ही आम्हाला कोणत्या जागा देणार ते सांगा, कमीत कमी आम्ही आमचं काम सुरू करू, अशी कळकळीची विनंती जलील यांनी केली असल्याचे सांगितले. 

आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार 
'वंचितच्या कमिटीला पत्र पाठवलेल आहे. खूप उशीर झाला म्हणून आम्हाला काळजी वाटते. आमची पण जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. यापुढे एकेक दिवस महत्वाचा आहे. एकेक दिवस पुढे जातो, तशी आमची काळजी वाढत आहे.

उद्या आमचे एक प्रतिनिधी मंडळ प्रकाश आंबेडकरांचू भेट घेणार आहेत. मी स्वतः उद्या किंवा परवा जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असून त्यांना विनंती करणार आहे. जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय कळवा म्हणजे कामाला लागता येईल' अशी विनंती करणार, असंही जलील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com