आता इम्तियाज जलील महापालिका आयुक्तांच्या मागे लागले !

महापालिका आयुक्त निपुण विनायक यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम केलेले आहे . औरंगाबाद महापालिकेत कोणी आयुक्त टिकत नाही म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. विनायक यांची नियुक्ती केलेली आहे. निपुण विनायक यांची वैयक्तिक प्रतिमा स्वच्छ आहे . मात्र त्यांचे राजकीय नेत्यांशी वारंवार खटके उडत आहेत .
imtiyaz_ghodele_nipun
imtiyaz_ghodele_nipun

औरंगाबादः महापालीकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार मिळत नाही, यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. तीन महिन्यापुर्वी या संदर्भात महापालिका आयुक्तांना मी माहिती मागितली होती. पण अद्याप त्यांनी ती दिलेली नाही.

एका खासदाराने माहिती मागितल्यावर देखील ते टाळाटळ करत आहेत, उडवाउडवीची उत्तरे देतात असा आरोप करत महापालिका आयुक्त निपूण विनायक यांच्या विरोधात आपण हक्कभंग आणणार आहोत अशी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयुक्त महापौरांच्या हातची कठपुतळी  म्हणुन काम करत आहेत असे सांगत आपण यापुर्वीच त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही इम्तियाज म्हणाले.

महापालिकेतील कंत्राटी कामगारांना प्रशासनाकडून दिला जाणारा व प्रत्यक्षात हातात पडणारा पगार यात प्रचंड घोळ आहे. अनेक कंत्राटी कामगारांनी या संदर्भात आपल्याकडे तक्रारी केल्या आहेत. आपल्याला केवळ आठ हजार रुपये मिळतात असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय चार चार महिने त्यांना पगार दिला जात नाही अशा अनेक तक्रारी घेऊन कंत्राटी कर्मचारी माझ्याकडे आले होते. कंत्राटदाराला महापालिकेकडून दर महिन्याला पैसे दिले जातात, तर मग कर्मचाऱ्यांवर अन्याय का? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.

एमआयएमच्या नगरसेवकांनी माहिती अधिकारात माहिती मागितली तर महापौरांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन माहिती देऊ नका असे सांगितले आहे. पण विरोधीपक्ष नेत्यांनी त्यांच्या अधिकारात ती कागदपत्रे मिळवली. मुळात आयुक्तांच्या मर्जीने हा प्रकार सुरू असल्याचे समजते असे म्हणत इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली.

कामगारांचे पैसे कुणाच्या घशात

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे महापालीका 15 हजार रुपये देते. मग बाकी पैसा जातो कुठे असा सवाल करत. यात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा पुनरूच्चार इम्तियाज यांनी केला. याशिवाय डेंगीचा शहरात कहर सुरू असतांना कोणतीही उपाययोजना केली जात नाही. एन 12 आणि मध्यवर्ती जकात नाका येथील समस्या वाढतच आहे. तेथील कचरा दहा दिवसांत हटवा अन्यथा एमआयएम तिथे जाऊन तोडफोड करेल असा गर्भीत इशारा देखील इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महापालिकेला दिला.

दरम्यान ,  महापालिका आयुक्त निपुण विनायक यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम केलेले आहे . औरंगाबाद महापालिकेत कोणी आयुक्त टिकत नाही म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. विनायक यांची नियुक्ती केलेली आहे. निपुण विनायक यांची वैयक्तिक प्रतिमा स्वच्छ आहे . मात्र त्यांचे राजकीय नेत्यांशी वारंवार खटके उडत आहेत . त्यामुळे विनायक स्वतः देखील औरंगाबादेत थांबायला उत्सुक नसल्याचे समजते . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com