Imtiaz Jaleel makes allegations against Kadeer Maulana | Sarkarnama

कदीर मौलानांचा मुलगा आणि गुंड बुथवर हैदोस घालत होते :इम्तियाज जलील

जगदीश पानसरे 
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

औरंगाबादः कदीर मौलाना यांचा मुलगा आणि त्यांचे पन्नास गुंड मतदारसंघात धुडगुस घालत होते, बुथवर आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बेदम मारहाण केली. मी पोलीसांना याची माहिती देऊन कदीर मौलाना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरण्यास सांगतिले, मात्र पोलीसांकडून काहीच कारवाई केली गेली नाही. 

औरंगाबादः कदीर मौलाना यांचा मुलगा आणि त्यांचे पन्नास गुंड मतदारसंघात धुडगुस घालत होते, बुथवर आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बेदम मारहाण केली. मी पोलीसांना याची माहिती देऊन कदीर मौलाना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरण्यास सांगतिले, मात्र पोलीसांकडून काहीच कारवाई केली गेली नाही. 

 त्याचा परिणाम आमच्या उमेदवाराला मारहाण करण्यात झाला. कदीर मौलाना यांना एमआयएमचे मतदान होऊ नये यासाठी शिवसेना-भाजपने पैसा पुरवला असावा, पोलीसांकडून कुठलीही कारवाई केली जाणार नाही याची हमी दिल्यामुळेच कदीर मौलांना आणि त्यांच्या गुंडाची हिमंत वाढली असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

कटकटगेट भागात एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने वातावरण तापले होते. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु अजूनही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये आग धुमसत आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मध्य मतदारसंघातील उमेदवार कदीर मौलाना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

इम्तियाज जलील म्हणाले, राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांनी मतदारांना वाटण्यासाठी पक्षाकडून कोट्यावधी रुपये आणल्याची माहिती आम्हाला होती. कालपासून त्यांनी आमच्या भागात गरीब मुस्लिम मतदारांच्या घरात जाऊन पैसे वाटले. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कदीर मौलाना यांचा मुलगा आणि त्यांचे पन्नास गुंड यांनी एमआयएमच्या बुथवरील कार्यकर्त्यांना धमकावून हुसकावून लावेल. यावेळी आमच्या दोन कार्यकर्त्यांना त्यांनी बेदम मारहाण देखील केली.

मला जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधून हा प्रकार तात्काळ रोखण्याची मागणी केली. पण पोलीसांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, त्यामुळे कदीर मौलाना आणि त्यांच्या समर्थकांची हिंमत वाढली.

सायकळी पाच वाजता कटकटगेट भागात पुन्हा त्यांच्या गुंडांनी धुडगुस घालण्यात सुरूवात केली. आमचे उमेदवार नासिर सिद्दीकी यांनाच थेट धक्काबुकी केली. याची माहिती मिळताच मी घटनास्थळी दाखल झालो तेव्हा कदीर मौलाना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना एकेकाला बोलावून मारहाण करण्यास सुरूवात केली आणि त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले.

मला धक्काबुक्की करण्याची कुणाची हिंमत?

इम्तियाज जलील यांना मारहाण, धक्काबुक्की झाल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, मला धक्काबुक्की करण्याची या शहरात कुणाची हिंमत नाही? माझ्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवाराला मारहाण केल्यामुळेच माझ्या संतापाच कडेलोट झाला. मी त्यांची समजूत काढण्यासाठी गेलो होतो, पण हा प्रकार पुर्वनियोजित आणि एमआयएमच्या मतदारांवर दहशत बसवण्यासाठी करण्यात आला होता. शिवसेनेच्या उमेदवाराला थेट फायदा पोचवण्यासाठी केलेला हा प्रकार असल्याचेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.

कदीर मौलाना व त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल होताच कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. कारवाई झाली नाही, तर याचे परिणाम वाईट होतील असा इशारा देखील शेवटी इम्तियाज यांनी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख