इम्तियाज जलील यांनी आमदार जैस्वालांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

इम्तियाज जलील यांनी प्रदीप जैस्वाल यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन दिवाळी तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
jaiswal jaleel
jaiswal jaleel

औरंगाबादः निवडणुकीतील जय-पराजय फारसा मनावर न घेता मोठ्या मनाने तो स्वीकारला पाहिजे. पण बऱ्याच राजकारण्यांच्या ते पचनी पडत नाही. औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्याच मध्य मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल मात्र याला अपवाद ठरले आहेत.

इम्तियाज जलील यांनी प्रदीप जैस्वाल यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन दिवाळी तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आणि भविष्यात शहराच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून काम करूया असे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून शिवसेना आणि एमआयएमच्या स्थानिक नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीतही ती दिसून आली होती. पण निवडणुका संपल्या, निकाल जाहीर झाले आणि झाले गेले विसरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यापुढे मैत्रीचा हात केला.

दिवाळी स्नेहमिलन आणि जैस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त सध्याआमदार प्रदीप जैस्वाल यांना शुभेच्छा देण्यासाठी समर्थनगर येथील त्यांच्या निवडणुक प्रचार कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. दोन दिवसांपासून इथे जैस्वाल समर्थक आणि सर्वसामान्य लोकांच्या रांगा लागल्या आहेत. जैस्वाल यांच्याकडून देखील भेटायला आलेल्या प्रत्येकाच्या शुभेच्छांचा स्वाकार करून त्यांचे तोंड गोड केले जात आहे.

खासदार इम्तियाज जलील दिल्लीत निवडूण गेल्यावर त्यांच्या मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विरुध्द एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांच्यात रंगतदार लढत झाली होती. निवडणुक प्रचारात या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत जोर लावला होता. अखेर जनतेने आपला कौल देत शिवसेनेच्य प्रदीप जैस्वाल यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.

इम्तियाज जलील व त्यांच्या पक्षाने या पराभावचे चिंतन तर सुरू केले, पण लोकांच्या मतांचा आदर राखत नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांना शुभेच्छाही दिल्या. इम्तियाज जलील हे स्वतः जैस्वाल यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दिवाळी व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इम्तियाज जलील अचानक जैस्वालांच्या कार्यालयात पोहचल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला, पण त्यांच्या या दिलदारपणाचे राजकीय वर्तुळातून कौतुक देखील होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com