Imtiaz Jaleel blames congress on Ayodhya issue | Sarkarnama

कॉंग्रेसने कुलुप उघडले नसते, तर आज हा दिवस आला नसता : इम्तियाज जलील

प्रकाश बनकर 
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

..

औरंगाबाद : आयोध्यातील जागेचा निकाल आज जाहिर झाला. सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो, आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नाही. आमची लढाई न्यायासाठी होती,खैरातीसाठी नव्हती. सुप्रीम कोर्टाचा आदर करतो,परंतु आमची नाराजी नोंदवायचा अधिकार आम्हाला आहे. कॉंग्रेसने कुलुप उघडले नसते, तर आज हा दिवस आला नसता.

मुस्लिम पर्सनल बोर्डाला विनंती करतो की, पाच एक्‍कर जागा कॉंग्रेसला दान करा. ही जागा कॉंग्रेस भवन बांधायला ती कामाला येईल. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी असा टोला पत्रकार परिषदेत कॉंग्रेसला लगावला.

आयोध्याचा निकाला आज सर्वोच्च न्यायालयाने जाहिर केला. त्याच विषयावर एमआयएमची भूमिका प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो,मात्र आम्हाला या विषयावर नाराजी व्यक्‍त करण्याचा अधिकार आहे. आमची न्यायालयीन लढाई ही न्यायासाठी होती. पाच एकर जागेसाठी नव्हती. भारतीय मुस्लिमांची इतकी ऐपत आहे की, ते एकटे जागा घेऊन मस्जीद बांधू शकतात, असे सांगत निकाला विषयी इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्‍त केली.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ज्या दिवशी बाबरी पडली, त्या दिवसापासून देशात हिंद-मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरु झाले. आणि त्याच मुद्यावर भाजप सत्तेत आली. या प्रकारास जेवढे कॉंग्रेस जबाबदार आहे. तेवढचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघही जबाबदार आहेत. देशाला हिंदु राष्ट्र बनविण्याची हालचालीला सुरुवात झाली आहे. असल्याचे आरोपही खासदार जलील यांनी केला.

फेर विचार याचिकेबाबात मुस्लिम पनर्सल लॉ बोर्ड जी भूमिका घेईल, ती आम्हाला मान्य असणार आहे. यासह पाच एकर जागा ही कॉंग्रेसला दान देऊ जेणेकरून कॉंग्रेस भवन बांधता येईल. बोर्डाला या विषयी विनंती करून ही जागा कॉंग्रेसला देण्याचा सांगू असे सांगत कॉंग्रेसच्या विरोधात आपला राग व्यक्‍त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख