मोदीजी आमचेही ऐका; चर्चा करताना भेदभाव नको- इमतियाज जलील 

देशावर ओढवलेल्या कोरोना संकटा विरोधात कसा लढा द्यायचा, यासंदर्भात येत्या आठ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
imtiaz jaleel appeals modi not to discriminate
imtiaz jaleel appeals modi not to discriminate

औरंगाबाद:  देशावर ओढवलेल्या कोरोना संकटा विरोधात कसा लढा द्यायचा, यासंदर्भात येत्या आठ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.  

परंतु पाचपेक्षा कमी खासदार असणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना या चर्चेत सहभागी करून घेतले जाणार नाही,  याबद्दल नाराजी व्यक्त करत एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इमतियाज जलील यांनी 'मोदी जी आमचेही, म्हणणे ऐका चर्चा करताना भेदभाव नको' असे आवाहन केले आहे.

इमतियाज जलील यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ प्रसारित करून पंतप्रधान मोदी यांना आवाहन केले आहे . इमतियाज जलील म्हणाले, देशावर कोरोना विषाणूचे मोठे संकट उभे ठाकले आहे. संपूर्ण देश या संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आपापल्यापरीने लढा देत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे व सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऐकुन घेण्याचे ठरवले आहे.

 येत्या आठ एप्रिल रोजी पंतप्रधान या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. परंतु यासाठी त्यांनी घातलेली पाच पेक्षा कमी खासदार असलेल्या राजकीय पक्षांना या चर्चेत सहभागी होता येणार नाही ही अट अन्यायकारक आहे.  मी स्वतः औरंगाबाद सारख्या लाखोंची लोकसंख्या असलेल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतो.

त्यामुळे येथील नागरिकांच्या ,कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या गरीबांच्या काय समस्या आहेत हे आपल्यापर्यंत पोहचवू इच्छितो. येथील आरोग्य यंत्रणांनाची स्थिती काय आहे? कुठल्या गोष्टी करणे आवश्यक आहे हे देखील आपल्या निदर्शनास आणून द्यायचे आहे .

परंतु आपण घातलेल्या अटींमुळे आम्हाला ते शक्य होणार नाही.  हा माझ्या पक्षासह ज्या राजकीय पक्षांचे खासदार पाच पेक्षा कमी आहेत अशा सर्वांवरच अन्याय ठरेल .

तेव्हा पंतप्रधान मोदींनी आठ तारखेला दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी छोट्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना देखील जाणून घ्याव्यात असे आवाहन इमतियाज जलील यांनी आपल्या व्हिडिओद्वारे केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com