Imtaij Jaleel on oath in Marathi | Sarkarnama

मी मराठीत शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर कौतुक झाले  : इम्तियाज जलील

प्रकाश बनकर 
रविवार, 8 सप्टेंबर 2019

औरंगाबाद:  लोकसभा सभागृहात मी मराठीत शपथ घेतली. त्यानंतर एमआयएमच्या खासदाराने मराठीत शपथ घेतल्यांचे स्कोर्ल मराठी चॅनलवर दिवसभर चालली होती. लोकांकडून सोशल मिडियावर कमेंट पडत होत्या.

आता खासदार साहेब मराठी शपथ घेतल्यानंतर पाच वर्षे काम नाही केले तरी चालेल, कारण तुम्ही मराठी अस्मिता राखली असल्याची प्रतिक्रीया औरंगाबादच्या दोन मुलांनी दिली होती, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

औरंगाबाद:  लोकसभा सभागृहात मी मराठीत शपथ घेतली. त्यानंतर एमआयएमच्या खासदाराने मराठीत शपथ घेतल्यांचे स्कोर्ल मराठी चॅनलवर दिवसभर चालली होती. लोकांकडून सोशल मिडियावर कमेंट पडत होत्या.

आता खासदार साहेब मराठी शपथ घेतल्यानंतर पाच वर्षे काम नाही केले तरी चालेल, कारण तुम्ही मराठी अस्मिता राखली असल्याची प्रतिक्रीया औरंगाबादच्या दोन मुलांनी दिली होती, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय, राज्य उर्दु साहित्य अकादमी आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातर्फे पारितोषिक वितरण समारंभ आणि उर्दु मुशायराचा कार्यक्रम औरंगाबादे झाला. या कार्यक्रमात खासदार जलील बोलत होते. 

जलील म्हणाले, माझे बोलणे कोण्या एका धर्माशी जोडले जाऊ शकत नाही. यामूळे मी मराठीत खासदारकीची शपथ घेतली होती. त्या मुलांच्या प्रतिक्रीयानंतर कळले की मराठीत शपथ घेतली की पाच वर्षे काम न करणे या पेक्षा चांगलं काय ? 

अतुल सावे राज्यमंत्री बनल्यानंतर मी खुश झालो . कारण सत्ताधारी पक्षातील त्यांचा मित्र आमदारनंतर मंत्री बनतो, तेव्हा या शहराचे अच्छे दिन येऊ शकतात . 

Image result for atul save facebook

अनेक वर्षांपासून आमखास मैदानावर चांगल्या दर्जाचे स्टेडीयम बनवण्याचा प्रयत्न मी करीत आहे. यासाठी आम्ही वक्‍फ बोर्डाला निवेदन दिले आहे. बोर्डाची एनओसी मिळवून द्या, मी दिल्लीहून निधी आणण्याची जबाबदारी माझी राहिलं. त्यानंतर या स्टेडियमच्या कामाची सुरुवात ही राज्यमंत्री अतुल सावे यांच्या कार्यकाळात झाले  इतिहासात नोंद   होईल, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

मी बारा वर्षे पत्रकार होतो. याच शहरातून पत्रकारिता सुरु केली होती. ज्या पत्रकरांसोबत मी काम करीत होतो, ते आजही त्याच पद्धतीची जीवन जगत आहेत. वक्‍फ बोर्डाच्या खुप जमीन आहेत. त्या अनेकांनी हडपल्या आहेत. उर्दु पत्रकार ज्यांनी उर्दु जिवंत ठेवली, त्यांच्यासाठी वक्‍फ बोर्डाची जागा द्यावी. त्यांच्यासाठी घरकुले बांधू . तुम्ही फक्‍त जमीन द्या.निधी आम्ही देऊ.

जालना रोडवर वक्‍फ बोर्डाच्या जागेवर एक अलीशान शॉपिग कॉम्प्लेक्‍स बनत आहेत. दिड लाखात एक गाळा विक्री केला जात आहेत. या लोकांवर कारवाई करावी . जमीन वक्‍फ बोर्डाची असल्यामूळे तिचा गैरवापर होऊ नये, असेही खासदार जलील म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख