इम्रान खानचा थयथयाट : नाझी आणि रा. स्व. संघाची केली तुलना

इम्रान खानचा थयथयाट : नाझी आणि रा. स्व. संघाची केली तुलना

श्रीनगर : काश्‍मीर प्रश्‍नावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज ट्विटच्या माध्यमातून थयथयाट केला. जम्मू आणि काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम भारताने रद्द करत या भागाचा जनसांख्यिकीय भूगोलच बदलण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वांशिक साफसफाईच्या माध्यमातून हे बदल घडवून आणले जात असून, आता खरा प्रश्‍न हा आहे की जग फक्त हातावर हात ठेवून पाहत राहणार का? हिटलरने म्युनिचमध्ये जे केले ते होताना जग ज्या पद्धतीने शांत होते, तसेच आताही राहणार का? असे प्रश्‍न इम्रान यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

आज विविध ट्विट्‌सच्या माध्यमातून इम्रान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने काम करत असल्याचा आरोप करत इम्रान यांनी भारत सरकारची तुलना नाझींसोबत केली आहे. संघाच्या तत्त्वज्ञानामध्ये हिंदूच सर्वोच्च स्थानी अशी मांडणी असून, जसे नाझींच्यादृष्टीने केवळ आर्यवंश हाच श्रेष्ठ होता. हे कोठेही थांबणार नसून भारतातील मुस्लिमांना दाबण्यात येईल आणि त्यानंतर पाकिस्तानलाही लक्ष्य करण्यात येईल, असा कांगावा त्यांनी केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com