मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील लढाईसाठी आज महत्वाची बैठक

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन लढाईसाठी उद्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
Important Meeting today in Mumabi for Maratha Reservation
Important Meeting today in Mumabi for Maratha Reservation

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन लढाईसाठी उद्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली मंत्रीमंडळ उपसमिती आज (शनिवार, ता. 29 फेब्रुवारी 2020) रोजी सकाळी 10.30 वाजता ट्रायडेंट हॉटेल, नरिमन पॉइंट, मुंबई येथे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची भेट घेणार आहेत.

याप्रसंगी राज्य सरकारच्या विधी, सामान्य प्रशासन व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहतील. या बैठकीत येत्या 17 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार्‍या सुनावणीसंदर्भात पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील इतर बाबींची देखील यावेळी चर्चा होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com