हिवाळी अधिवेशन: महिला मंत्री अनोख्या अंदाजात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारमधील महिला मंत्र्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह स्मृती इराणी आणि लॉकेट चॅटर्जी यांनी उपस्थिती लावली होती.
हिवाळी अधिवेशन: महिला मंत्री अनोख्या अंदाजात
Published on

अधिवेशनाला सुरुवात होण्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरवातच निदर्शनाने झाली. कृषीविषयक कायदे मागे घेण्यास होत असलेली दिरंगाई आणि शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेसनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने संसदेबाहेर निदर्शने केली. या निदर्शनात पक्षाच्या कार्याध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित होते.

संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही मिनिटातंच लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तर दूसरीकडे राज्यसभेचे कामकाज सुरू होते.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत कृषीविषयक कायदे मागे घेण्याबाबत विधेयक मांडले.

या गदारोळात लोकसभेत कृषीविषयक कायदे मागे घेण्याबाबत विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.

कृषी कायदा मागे घेण्याचे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत कृषी कायदे रद्दबातल विधेयक मांडले. यापूर्वी लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही आवाजी मतदानाने कृषी कायदे रद्द करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज मंगळवारी (३० नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

गेल्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 12 खासदारांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेतील 12 खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसच्या 6 राज्यसभा खासदार, टीएमसी आणि शिवसेनेचे 2-2 खासदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. सीपीआयच्या एका खासदाराला आणि सीपीएमच्या एका खासदारालाही निलंबित करण्यात आलं आहे.

केरळच्या तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी थरूर यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शशी थरुर यांनी सहा महिला खासदारांसोबतचे स्वतःचे छायाचित्र पोस्ट केले आहे. या छायाचित्रात शशी थरूर, सुप्रिया सुळे, प्रनीत कौर, तमिजाची, मिमी चक्रवर्ती, नुसरत जहाँ आणि ज्योती मणी मध्यभागी दिसत आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान हा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com