Atal Bihari Vajpayee Birth Anniversary : 'सरकारे येतील आणि जातील पण लोकशाही टिकली पाहिजे...' अटलबिहारी वाजपेयी असं का म्हणाले होते?

आज 25 डिसेंबर रोजी देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती आहे.
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary
Published on
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने वाजपेयी यांची समाधी असलेले 'सदैव अटल'वर येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली.

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary

राजकारणी असण्यासोबतच अटल हे कवीही होते. ते संसदेत बोलायला उठले की त्यांचे विरोधकही त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत असत. 31 मे 1996 रोजी त्यांनी संसदेत दिलेले भाषण भारतीय लोकशाहीत नेहमीच स्मरणात राहील.

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary

31 मे 1996 रोजी संसदेत विश्वासदर्शक ठरावावेळी अटलजी म्हणाले होते, "सरकार येतील आणि जातील, पण हा देश आणि या देशाची लोकशाही अमर राहिली पाहिजे." त्यांची ही गोष्ट भारतीय लोकशाहीत नेहमीच गुंजत राहील. अटलजींची खास बाब म्हणजे त्यांनी तत्त्वांसाठी आपल्या सरकारचा त्याग केला होता.

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary

"आज देश संकटांनी घेरला आहे आणि आम्ही ही संकटे निर्माण केलेली नाहीत. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही त्या वेळच्या सरकारला समस्या सोडवण्यासाठी मदत केली. "सत्तेचा खेळ चालेल, सरकारे येतील आणि जातील, पक्ष बनतील, पण हा देश टिकला पाहिजे, ही देशाची लोकशाही अमर राहावी." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. नरसिंह राव सरकारच्या कार्यकाळातील आठवणी अटलजींनी सभागृहात जागवल्या.

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary

"ही चर्चा आज संपेल पण उद्यापासून जो अध्याय सुरू होईल, त्या अध्यायाकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. ही कटुता वाढू नये. ज्या प्रकारे आरएसएसवर आरोप केले गेले, त्यांची गरज नव्हती. लोकांच्या मनात आरएसएसबद्दल आदर आहे. जर ते झोपडपट्ट्यांमध्ये काम करत असतील, आदिवासी भागात जाऊन शिक्षणाचा प्रसार करत असतील तर त्यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य करायला हवे." असंही त्यांनी म्हटलं होतं.

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary

तसेच "जर मी पक्ष तोडला आणि सत्तेत येण्यासाठी नवीन आघाड्या केल्या तर मला त्या सत्तेला हात लावायलाही आवडणार नाही., अशा भावनाही त्यांनी सभागृहात व्यक्त केल्या होत्या. 1996 मध्ये अटलजींना केवळ 13 दिवस सरकार चालवण्याची संधी मिळाली. 1998 मध्ये पुन्हा एकदा मित्रपक्षांनी साथ सोडल्यानंतर केवळ 13 महिन्यांत अटलजींचे सरकार पडले. पण 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा एकदा अटलजींवर विश्वास दाखवला आणि यावेळी त्यांनी संपूर्ण पाच वर्षे सरकार चालवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com