संसदेवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ...

13 डिसेंबरच्या त्या दिवशी सकाळी एका पांढऱ्या अॅम्बेसेडर कारमध्ये असलेल्या पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी संसद भवनाच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला.
2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack
Published on
2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack

वीस वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच १३ डिसेंबर २००१ रोजी लोकशाहीचे मंदिर मानले जाणाऱ्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी संसद भवनाच्या परिसरात पोहोचले. त्यावेळी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले होते.

2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack

त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संसद भवनातून बाहेर पडले होते. मात्र, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह 100 जण संसद भवनात होते.

2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack

AK47 रायफल, ग्रेनेड लाँचर, पिस्तूल आणि ग्रेनेड्स घेऊन दहशतवाद्यांनी संसद परिसराभोवती तैनात असलेला सुरक्षा घेरा तोडला. त्यांनी गाडी आत घेतली. त्यांच्या या हालचालींचा तिथे तैनात असलेल्या कॉन्स्टेबल कमलेशकुमारी यादव यांना त्यांचा संशय आला.

2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack

मात्र दहशतवाद्यांनी कमलेश यांच्यावर 11 गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. ही दहशतवादी कारवाई सुमारे 30 मिनिटे चालली, ज्यामध्ये एकूण नऊ जण ठार झाले, तर 18 जण जखमी झाले.

2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack

हल्ल्याची माहिती मिळताच पुढच्या काही मिनिटांत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवान घटनास्थळी पोहचले आणि काही मिनिटाच सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला.

2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack

या दहशतवादी हल्ल्यात कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यादव या पहिल्या शहीद झाल्या होत्या. याशिवाय संसदेचा एक माळी, संसद भवनातील दोन सुरक्षा कर्मचारी आणि 6 दिल्ली पोलिस कर्मचारी शहीद झाले.

2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack

या दहशतवादी हल्ल्यामागे मोहम्मद अफजल गुरू, एसएआर गिलानी आणि शौकत हुसैन यांच्यासह पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात होता. संसद हल्ल्याच्या १२ वर्षांनंतर ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफजल गुरुला फाशी देण्यात आली.

2001 India Parliament Attack
2001 India Parliament Attack

संसदेच्या संकुलात घुसून दहशतवाद्यांना नेते आणि मंत्र्यांना लक्ष्य करायचे होते, परंतु सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे ते अपयशी ठरले आणि तिथेच मारले गेले. मात्र, यावेळी देशाच्या 9 शूर जवानांनीही दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.

जेपी यादव, मतबर सिंग, कमलेश कुमारी, नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, घनश्याम, बिजेंदर सिंग, देशराज यांसारखे वीर देशावरील या दहशतवादी हल्ल्याचे मनसुबे उधळून लावताना शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्यात वृत्तसंस्था एएनआयचा कॅमेरामन विक्रम सिंह बिश्त यांचाही मृत्यू झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com