अमली पदार्थ म्हणजे काय, कुठे होते त्यांचे उत्पादन?

जगभरात सुमारे 234 दशलक्ष लोक या अंमली पदार्थांचे सेवन करतात. तर दरवर्षी सुमारे 2 लाख लोक या अंमली पदार्थांमुळे आपला जीव गमावतात.
Drugs
Drugs
Published on
Drugs
Drugs

अलीकडच्या काळात अंमली पदार्थांचे व्यसन हे सर्व देशांसाठी भयंकर समस्येचे कारण बनले आहे. तरुण पिढी मद्यधुंद होताना दिसत आहे. हे कोणत्याही देशासाठी चांगले लक्षण नाही.

Drugs,
Drugs,

संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजन्सी UNODC च्या मते, जगभरात सुमारे 234 दशलक्ष लोक या अंमली पदार्थांचे सेवन करतात. तर दरवर्षी सुमारे 2 लाख लोक या अंमली पदार्थांमुळे आपला जीव गमावतात. पण तरीही त्यांचा वापर केला जात आहे.

Drugs
Drugs

-अमली पदार्थ म्हणजे काय

ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात.

Heroin
Heroin

- हे आहेत अमली पदार्थ उत्पादक देश

यांमारमधील हेरॉईन

दक्षिण पुर्व आशियात, यांमार, लाओस आणि कंबोडिया हे तीन देश अफू आणि हेरॉईन उत्पादनात आघाडीवर आहे. याठिकाणी दरवर्षी 1000 टन अफू तयार होते. येथून ते थायलंड आणि इंडोनेशियासह इतर दक्षिण पुर्व आशियाई देशांना पुरवले जाते.

Cocaine
Cocaine

कोलंबियाचे कोकेन

संपुर्ण जगात कोलंबिया, बोलिव्हिया आणि पेरू या देशांमध्ये कोकेनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. या तीन देशांमध्ये 135,000 एकरांमध्ये कोका पानांची लागवड केली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थविरोधी एजन्सी UNODC च्या मते, कोलंबिया दरवर्षी 300 ते 400 टन कोकेन तयार करते. कोकेनचे प्रमुख बाजार दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोप आहेत.

Afu
Afu

अफगाणिस्तानची अफू

अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश आहे. अफगाणिस्तानात दरवर्षी 5,000 ते 6,000 टन अफू तयार होते. अफगाणिस्तानातून नाटो सैन्य मायदेशी परतल्यानंतर अफगाणिस्तानात अफूचे उत्पादन घेण्यास सुरवात झाली. अमेरिका आणि आशिया येथे अफूची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

Cannabis
Cannabis

मोरोक्कोचा गांजा (भांग)

मोरोक्कोमध्ये दरवर्षी 1500 टन चरस आणि गांजाचे उत्पादन घेतले जाते. मोरोक्कोमध्ये सुमारे 134,000 हेक्टर जमीनीवर गांजाची शेती केली जाते. काही अमेरिकन राज्ये आणि मेक्सिकोमध्ये कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर याठिकाणी औषधी गांजाची लागवड वाढली आहे.

Crystal Meth
Crystal Meth

अमेरिका आणि मेक्सिकोमधील क्रिस्टल मेथ

UNODC च्या अहवालानुसार, कृत्रिम औषध क्रिस्टल मेथचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नेमके कोणते देश त्याचे सर्वात मोठे उत्पादक आहेत हे माहित नाही. पण घरगुती प्रयोगशाळेत बनवणे सोपे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये अमेरिकन पोलिसांनी अशा 12,000 प्रयोगशाळांवर छापा टाकला. 2014 मध्ये जगभरात पकडलेल्या 144 टन क्रिस्टल मेथपैकी 80 टक्के अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये सापडले.

Charas
Charas

या देशांसह, बहामास, बेलीज, बोलिव्हिया, म्यानमार, कोस्टा रिका, डोमिनिकन रिपब्लिक, इक्वाडोर, अल साल्वाडोर, ग्वाटेमाला, हैती, होंडुरास, जमैका, लाओस, मेक्सिको, निकारागुआ, पाकिस्तान, पनामा आदी देशांमध्येही अंमली पदार्थांचे उत्पादन घेतले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com