नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री ते खासदार; असा आहे उदयनराजे भोसले यांचा प्रवास...

Satara : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भोसले यांचे चिरंजीव आहेत. छत्रपतींच्या साताऱ्याच्या गादीचे वंशज आहेत. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. आज (ता. २४) त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा...
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
उदयनराजे भोसले यांचा जन्म नाशिकमध्ये २४ फेब्रुवारी १९६६ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण देहरादूनला   तर पुढील शिक्षण पाचगणीला  झाले. सध्या ते आई श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंहराजे भोसले यांच्यासोबत सातार्‍यातील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी राहतात.
उदयनराजे भोसले यांचा जन्म नाशिकमध्ये २४ फेब्रुवारी १९६६ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण देहरादूनला तर पुढील शिक्षण पाचगणीला झाले. सध्या ते आई श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंहराजे भोसले यांच्यासोबत सातार्‍यातील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी राहतात. sarkarnama
 २० नोव्हेंबर २००३ रोजी दमयंतीराजे यांच्याशी लग्न झाले. त्यांना वीरप्रतापसिंहराजे आणि नयनताराराजे अशी दोन मुले आहेत.
२० नोव्हेंबर २००३ रोजी दमयंतीराजे यांच्याशी लग्न झाले. त्यांना वीरप्रतापसिंहराजे आणि नयनताराराजे अशी दोन मुले आहेत. sarkarnama
उदयनराजेंची राजकिय कारकिर्द नगरसेवक पदापासून सुरू झाली. १९९१ मध्ये ते सातारा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९६ मध्ये सातारा लोकसभा निवडणूकीत अपयश आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९९८ च्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपमधून उदयनराजे निवडून आले. त्यांना महसूल राज्यमंत्री पद देण्यात आले. भाजपचे नेते कै. गोपीनाथ मुंडेंशी उदयनराजेंची खास जवळीक होती.
उदयनराजेंची राजकिय कारकिर्द नगरसेवक पदापासून सुरू झाली. १९९१ मध्ये ते सातारा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९६ मध्ये सातारा लोकसभा निवडणूकीत अपयश आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९९८ च्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपमधून उदयनराजे निवडून आले. त्यांना महसूल राज्यमंत्री पद देण्यात आले. भाजपचे नेते कै. गोपीनाथ मुंडेंशी उदयनराजेंची खास जवळीक होती. sarkarnama
जेम्स लेनप्रकरणी भाजपने योग्य भूमिका घेतली नाही, असा आरोप करत उदयनराजे भाजपमधून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर उदयनराजेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, पण कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही, हे कळल्यावर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं.
जेम्स लेनप्रकरणी भाजपने योग्य भूमिका घेतली नाही, असा आरोप करत उदयनराजे भाजपमधून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर उदयनराजेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, पण कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही, हे कळल्यावर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं.sarkarnama
२००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले.
२००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले.sarkarnama
२०१९ मध्ये ते राष्ट्रवादीचा राजीनामा देत ते पुन्हा भारतीय जनता पक्षात गेले. परंतु लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर घेऊन पुन्हा खासदार केले.
२०१९ मध्ये ते राष्ट्रवादीचा राजीनामा देत ते पुन्हा भारतीय जनता पक्षात गेले. परंतु लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर घेऊन पुन्हा खासदार केले. sarkarnama
खासदार उदयनराजे भोसले यांचा आज (ता. २४) वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांचा आज (ता. २४) वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com