असा असतो छत्रपतींच्या घरातील शाही दसरा, एकदा पहाच

करवीर नगरीतील ऐतिहासिक महत्त्व असलेला पारंपरिक आणि ऐतिहासिक दसरा सोहळा शाही थाटात संपन्न झाला. करवीर अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते शमीपूजन करून सीमोल्लंघन सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील अन्य मान्यवर ही उपस्थित होते.
असा असतो छत्रपतींच्या घरातील शाही दसरा, एकदा पहाच
Published on

सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास नवीन राजवाड्याच्या भवानी मंडपातून पारंपरिक पोशाखात छत्रपतींचा लवाजमा निघाला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज संभाजीराजे, महाराज कुमार मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे, यशस्विनीराजे पोलिस संचलनातील वाहनांच्या ताफ्यासह "मेबॅक' मोटारीतून दसरा चौकात दाखल झाले.

वाहतूक नियंत्रण शाखेच्या मोटारसायकलीच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे यशस्विनीराजे दसरा चौकात आले.

दसरा महोत्सव समितीच्या वतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पोलीस बँडच्या तालावर करवीर संस्थानच्या गीताचे सादरीकरण झाले. सरदार, मानकऱ्यांचे मुजरे घेत शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य स्थानापन्न झाले.

राजपुरोहित दादर्णे यांच्या पौरोहित्याखाली शमी पूजनाचा विधी पार पडला. शमी पूजनानंतर राजघराण्याने सोने लुटले. बंदुकीच्या फैरीने सोने लुटल्याची वर्दी दिली आणि निमंत्रितांमध्ये सोने लुटण्यासाठी झटापट सुरू झाली. काही वेळातच लुटलेले सोने एकमेकांना देत "सोने घ्या, सोन्यासारखे राहा,' अशा शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू झाली.

परंपरेनुसार दसरा चौकातून छत्रपतींचा लवाजमा जुन्या राजवाड्याकडे मार्गस्थ झाला. जुन्या राजवाड्यात त्यांनी जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

छत्रपतींनी अंबाबाईचे, पंचगंगा घाटावरील संस्थान शिवसागर स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते नवीन राजवाड्यावर परतले. श्री अंबाबाईची पालखी मंदिरात जाण्यापूर्वी सिद्धार्थनगरात गेली. तिथेही ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले.

शाही दसरा सोहळ्याला माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com