G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

G-20 summit : छत्रपती संभाजीनगरमध्ये परदेशी पाहुण्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, पाहा खास फोटो!

G-20 summit Aurangabad : छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून जी-20 महिलांची परिषद
Published on
G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

G 20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देश विदेशातून आलेल्या पाहुण्यांचं संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं आहे. परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन होताच, त्यांचे खास मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करण्यात आले. शिष्टमंडळ विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासमोर लेझीमचे आणि इतर वाद्यांचे सादरीकरण केले.

G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

विमानतळावर विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय वित्त् राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते. यावेळी जागतिक वारसा असलेल्या अजिंठा आणि वेरुळ लेणीची तसेच, संभाजीनगर शहराची थोडक्यात माहिती कराड यांनी शिष्टमंडळाला दिली.

G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

दोन दिवसीय परिषदेमध्ये महिलांच्या नेतृत्वात देशांचा विकास आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी प्रमुख 6 मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

या परिषदेत उद्योजक महिला, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल समानता, शिक्षण व कौशल्य विकास आणि हवामान बदलावरच्या उपाययोजनेवर कृती समूहात महिला - मुलींचा परिवर्तनकर्त्या म्हणून समावेश, या विषयांवर चर्चा होणार आहे.

G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

W20 ची बैठकीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले. यावेळी भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्यासह G-20 चे शेर्पा अमिताभ कांत आणि W20 चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्डन तुर्कतान यांची उपस्थिती होती.

G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

या बैठकीत लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर स्मृती इराणी यांनी आपले विचार मांडले.

G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

या परिषदेत महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ, आर्थिक सक्षमीकरण, हवामानातील बदल, सक्षम प्रणाली, कौशल्य विकास या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

G20 summit Aurangabad
G20 summit AurangabadSarkarnama

या बैठकीत सहभागी होण्यासाठी 19 देशांचे आणि युरोपीय संघाचे 150 प्रतिनिधी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com