राज्यपालांच्या हस्ते 97 पोलिसांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान

President's Police Medal|Maharashtra| या समारंभात पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल दहा पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली.
President's Police Medal Awards 2020 ceremony
President's Police Medal Awards 2020 ceremony
Published on

मुंबई : राज्यातील 97 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सोमवारी (दि. 21 मार्च) राजभवनात 2020 मध्ये जाहीर केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके (Presidential Police Medal) आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके प्रदान करण्यात आली.

President's Police Medal Awards 2020 ceremony
President's Police Medal Awards 2020 ceremony

या समारंभात पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल दहा पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदके (Police gallantry medals) प्रदान करण्यात आली. तर 8 पोलीस अधिकारी व जवानांचा उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले. याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 79 पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

President's Police Medal Awards 2020 ceremony
President's Police Medal Awards 2020 ceremony

या पोलीस अलंकरण समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, यांच्यासह पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व गौरविण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबियही उपस्थित होते.

President's Police Medal Awards 2020 ceremony
President's Police Medal Awards 2020 ceremony

पोलीस शौर्य पदकांनी गौरव

पोलीस उप आयुक्त‍ डॉ. एम. सी. व्ही. महेश्वर रेडडी, पोलीस आयुक्त कार्यालय बृहन्मुंबई, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण समीरसिंह द्वारकोजीराव साळवे,गडचिरोली अविनाश अशोक कांबळे, पोलीस हवालदार गडचिरोली सुरपत बावजी वड्डे, पोलीस नाईक गडचिरोली वसंत बुचय्या आत्राम,पोलीस शिपाई गडचिरोली नंदकुमार उत्तेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक सोलापूर ग्रामीण मिथु नामदेव जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, गडचिरोली आशिष मारुती हलामी, पोलीस शिपाई गडचिरोली विनोद चैतराम राऊत, आग्रे व पोलीस शिपाई गडचिरोली हामित विनोद डोंगरे यांना पोलीस शौर्य पदकांनी गौरवण्यात आले.

President's Police Medal Awards 2020 ceremony
President's Police Medal Awards 2020 ceremony

उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक

सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) रामचंद्र शिवाजी जाधव, सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) राजाराम रामराव पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) मारुती कल्लाप्पा सूर्यवंशी, प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग मंत्रालय, मुंबई संजय सक्सेना, सहायक पोलीस उप निरीक्षक वसंत रामचंद्र साबळे (सेवानिवृत्त), सहायक पोलीस आयुक्त मिलींद भिकाजी खेटले, सहायक समादेशक हरिश्चंद्र गोपाळ काळे, अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, अप्पर पोलीस महासंचालक व यांना उल्लेखनीय सेवेबददल राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.

President's Police Medal Awards 2020 ceremony
President's Police Medal Awards 2020 ceremony

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण विक्रम नंदकुमार देशमाने, पोलीस उप आयुक्त सुरेशकुमार सावलेराम मेंगडे,अपर पोलीस अधीक्षक (सेवानिवृत्त) दिलीप पोपटराव बोरस्टे, पोलीस उपअधीक्षक अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी, सहायक पोलीस आयुक्त नेताजी शेकुंबर भोपळे (सेवानिवृत्त), सहायक पोलीस आयुक्त किरण विष्णू पाटील (सेवानिवृत्त), सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) मुकुंद नामदेवराव हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश दिगंबर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली साबिर अली, पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ गनी शेख, पोलीस निरीक्षक नानासाहेब विठ्ठल मसाळ, पोलीस उप अधीक्षक गोपिका शेषदास जहागिरदार, सहायक पोलीस आयुक्त बालाजी रघुनाथ सोनटक्के, पोलीस उप अधीक्षक राजेद्र लक्ष्मणराव कदम, पोलीस उप अधीक्षक रविंद्र गणपत बाबर,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com