असा असतो छत्रपतींच्या घरातील नवरात्रोत्सव

राज्यातच सर्वत्र नवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून संपूर्ण भारतात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, छत्रपतींच्या घरात नवरात्रीचा हा सण कसा साजरा करतात. चला तर मग पाहूयात
असा असतो छत्रपतींच्या घरातील नवरात्रोत्सव
Published on

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी छत्रपतींच्या जुन्या राजवाड्यात अंबा देवघरात देवीची घटस्थापना करण्यात आली, कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची आरती करून नवरात्रोत्सवास सुरूवात केली.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही अंबा देवघरात श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची आकर्षक पूजा बांधून आरती करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवीची वनविहार करणारी आकर्षक पुजा मांडण्यात आली होती.

चौथ्या दिवशी करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीची मयूरावर विराजमान झालेली पुजा मांडण्यात आली होती.

यावेळी श्रीमंत यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. चौथ्या दिवशी ललित पंचमी निमित्त श्री त्र्यंबोलीदेवी टेकडीवर पारंपरिक पध्दतीने कोहळा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्रीमंत महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत राजकुमार यशराजराजे छत्रपती आणि मानकरी उपस्थित होते.

नवरात्रीच्या पाचव्या म्हणजेच ललीतपंचमी निमित्ताने अंबा देवघरात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची झोपाळ्यावर बसलेली पुजा बाधंण्यात आली होती.

आदिलशाहीच्या काळात अंबाबाईची मूर्ती श्रीपूजकांनी लपवून ठेवली होती. स्वराज्याच्या स्थापनेनंतर राज्य स्थिरस्थावर झाले, तेव्हा कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आज्ञेने सन १७१५ साली अंबाबाईच्या मूर्तीची मंदिरात पुनर्स्थापना करण्यात आली. पुढे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेप केला होता. त्यानंतर संभाजी छत्रपती राजे यांचे आजोबा श्री शहाजी छत्रपती महाराज यांनी हे मंदीर सर्वांसाठी खुले करून ते सरकारकडे स्वाधीन केले.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी अंबा देवघरात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची केळीच्या बनात फलाहार घेणारी आकर्षक पुजा बाधंण्यात आली होती.

सातव्या दिवशी अंबा देवघरात गजारुढ रुपातील श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची आकर्षक पुजा करण्यात आली होती.

नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी अंबा देवघरात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची विड्याच्या पानातील आकर्षक पुजा बाधंण्यात आली होती.

Related Stories

No stories found.