शिवशाहिराला अखेरचा निरोप; उपस्थितांना अश्रू अनावर

शिवशाहीर, शिवचरित्र्यकार अशी साऱ्या महाराष्ट्राला ओळख असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पाच वाजून 10 मिनिटांनी (ता.१५) पुण्यात एका खासगी रूग्णालयात वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले.
शिवशाहिराला अखेरचा निरोप; उपस्थितांना अश्रू अनावर
Published on

पुण्यातील वैकुंठ स्मशानभुमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. बाबासाहेब पुरंदरेंच्या अंतिम संस्कारावेळी स्मशानभुमीत अलोट गर्दी पाहायला मिळाली.

शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रात घरोघरी पोचले. त्यांना अखेरचा निरोप देताना स्मशानभुमीत अभुतपुर्व अशी गर्दी जमली होती. लांबून लांबून लोक त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी आले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या अखेरच्या प्रवासाला महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप नेते उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. बाबासाहेब पुरंदरे कुटुंबाचे पवार कुटुंबियांशी असलेल्या आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला.

अमोघ वक्तृत्वाने ऐकणाऱ्या समोर इतिहास उभा करण्याचे कसब त्यांच्यात होते. त्यांच्या याच शैलीमुळे ते सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य् करत होते. बाबासाहेब पुरंदरेंचे अखेरचे दर्शन घेताना त्यांच्या निकटवर्तीयांना अश्रू अनावर झाले होते.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरेंचे अखेरचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवाची परंपरा अजून समृद्ध, अजून सुदृढ, अजून शक्तिशाली बनवण्यासाठी आपण सर्वांनी काम करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

बाबासाहेब पुरंदरेंनी वयाची नव्वदी उलटल्यानंतरही त्याच्या वाणीतील आणि विचारांतील उत्साह कायम होता. अखेरचा निरोप देताना त्यांच्या निकटर्तीयांना अश्रु अनावर झाले होते.

आपल्या विशिष्ट शैलीने गेल्या साठ वर्षांपासून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य महाराष्ट्रातील घराघरात पोचविले. राज्यभरातील जनतेच्या मनावर अधिराज्य केले. त्यांना अखेरचा निरोप देताना मात्र संपुर्ण महाराष्ट्र हळहळत होता.

Related Stories

No stories found.