मंत्री धनंजय मुंडे क्रिकेटनामात रंगले...

सरकारनामाने दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. या सामन्यात राष्ट्रवादीच्या संघाने शिवसेनेच्या संघावर मात करत सरकारनामा क्रिकेट चषक आपल्या नावे केला.
मंत्री धनंजय मुंडे क्रिकेटनामात रंगले...
Sarkarnama| Cricketnama| Offbeat Photo
Published on
Dhananjay munde
Dhananjay munde

दरम्यान, दोन दिवसीय सामन्यांनंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. ''सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा आयोजित क्रिकेटनामा या मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रवादी कॉंग्रेस टीमच्या वतीने सहभागी होऊन, क्रिकेटचा आनंद घेतला. राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा मैत्रीपूर्ण सामना आम्ही जिंकला, अनिकेत तटकरे भाई सुंदर खेळी करत सामनावीर ठरला!

NCP Cricketnama team
NCP Cricketnama team

राजकीय पटलावर सदैव एकमेकांच्या स्पर्धेत किंवा विरोधात टोलेबाजी करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना एकत्र आणून या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून वेगळे खेळीमेळीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारनामा टीमचे आभार व अभिनंदन! अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Sarkarnama-cricketnama cricket news
Sarkarnama-cricketnama cricket news

राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी-फलंदाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांची सरकारनामा आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेत प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानातली कामगिरीही जोरदारपणे रंगली होती

Dhananjay Munde in Cricketnama news
Dhananjay Munde in Cricketnama news

राजकीय नेते, पोलिस अधिकारी अन् क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला सहकारी पक्ष शिवसेनेवर मात करीत रविवारी सरकारनामा 'क्रिकेटनामा'चषक पटकावला. 'क्रिकेटनामा' चषक पटकावणारा राष्ट्रवादी हा पहिला संघ ठरला.

Sarkarnama news
Sarkarnama news

सरकारनामामाने भरविलेल्या सामन्याचा चषक कोण जिंकणार यांची प्रचंड उत्सुकता होती. अंतिम फेरीत राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आले. पहिल्यांदा फलंदाजी करुन राष्ट्रवादीने ४८ धावांचे टार्गेट शिवसेनेपुढे ठेवले.

Sarkarnama -Cricketnama  latest news
Sarkarnama -Cricketnama latest news

सरकारनामाची ट्रफी जिंकण्यासाठी सेमीफायनलकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. राष्ट्रवादी आणि पोलिस या दोन्ही संघामध्ये ताकदवान खेळाडू होते. राष्ट्रवादीने पहिली फलंदाजी केली. यामध्ये त्यांनी ३५ धावांचे आव्हान उभे केले.

Offbeat Photos
Offbeat Photos

.शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या टीमने विजय मिळवला. राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला.

team NCP
team NCP

राष्ट्रवादीने आक्रमक शेत्ररक्षण करत पोलिस संघाला शेवटपर्यंत झुंजायला लावले. एकामागे एक विकेट पडल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या संघ अडचणीत आला.

राष्ट्रवादीच्या संघाचे कर्णधार प्रशांत जगताप यांनी रणनिती करत क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला

Sarkarnama-Cricketnama news
Sarkarnama-Cricketnama news

सरकारनामाचा 'क्रिकेटनामा'स्पर्धेत शिवसेनेपुढे ४८ धावांचा डोंगर उभा केलेल्या राष्ट्रवादीने शिवसेनेला २६ धावांच्या पुढे जाऊ दिले नाही. महाविकास आघाडीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं हा सामना राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा केला.

Sarkarnama-Cricketnama news
Sarkarnama-Cricketnama news

दोन्ही संघाने डावपेच रचल्याने चुरस निर्माण झाली होती. "मी आधीच सांगितले होते राष्ट्रवादी जिंकणार. आता महापालिका देखील राष्ट्रवादीच जिंकणार. महापौर राष्ट्रवादीचाच होणार," असे प्रशांत जगताप म्हणाले.

Dhananjay munde
Dhananjay munde

राष्ट्रवादीच्या संघाचे कर्णधार प्रशांत जगताप यांनी रणनिती करत क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in