देशातल्या शेवटच्या माणसालाही सर्व सेवा सुविधांचा फायदा व्हावा, असे महात्मा गांधींचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला झोकून दिले आहे.
देशाचा विकास कऱण्यासाठी पाच संकल्प करायला हवेत. येत्या 25 वर्षांसाठी हे पाच संकल्प करायचे आहेत. हे पंचप्राण आहेत. स्वातंत्र्यप्रेमींच्या स्वप्नांची प्रतिज्ञा घ्यायची आहे.
पहिला संकल्प - आता मोठा संकल्प घेऊन देश चालवणार. हा मोठा संकल्प विकसित भारताचा आहे. यात कमी काहीही होणार नाही. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.
दुसरा संकल्प - जर आपल्या मनात गुलामगिरीचा अंशही कोणत्याही कोपऱ्यात असेल तर तो सुटू देऊ नका. शेकडो शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने आपल्याला वेठीस धरले आहे, आपल्या विचारात विकृती निर्माण केली आहे. गुलामगिरीची छोटीशी गोष्टही दिसली तर त्यातून सुटका करून घ्या.
तिसरा संकल्प - आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. हाच वारसा सतत नवनवीनतेने स्वीकारला आहे.
चौथा संकल्प - एकता आणि एकजुटपण 130 कोटी देशवासियांमध्ये एकता, एक भारत श्रेष्ठ भारत हा आमचा चौथा संकल्प आहे.
Pm PM Narendra Modi |15 August 2022पाचवा संकल्प - नागरिकांचे कर्तव्य. आपली येत्या २५ वर्षांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही मोठी बांधिलकी आहे. जेव्हा स्वप्ने मोठी असतात तेव्हा प्रयत्नही खूप मोठे असतात.
मोठा संकल्पाने स्वातंत्र्य झालो - देशवासियांनी स्वातंत्र्याचा मोठा संकल्प केला आणि आपण स्वतंत्र झालो. हे घडले कारण ठराव खूप मोठा होता. ठराव मर्यादित असता तर कदाचित आजही आम्ही लढतच राहिलो असतो.
नवीन शैक्षणिक धोरण - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी करोडो लोकांचा सल्ला घेण्यात आला. भारताने जमिनीवर आधारित शिक्षण धोरण बनवले आहे.
जेव्हा आपण आपल्या जमिनाशी जोडले जाऊ तेव्हाच आपण उंच उडू. तरच आपण जगाला समाधान देऊ शकू. निसर्गावर प्रेम कसे करावे हे आपल्याला माहित आहे. ग्लोबल वार्मिंगची समस्या सोडवण्याचा मार्ग आपल्याकडे आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला तो दिला आहे. जेव्हा जग सर्वांगीण आरोग्य सेवेबद्दल बोलतं तेव्हा जगाच्या नजरा भारताच्या योगाकडे वळतात. तो भारताच्या आयुर्वेदात मिळतो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.