पंंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनावर विशालकाय अशोक स्तंभाचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाच्या छतावरील 20 फूट उंच अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.
Central Vista Project
Central Vista Project
Published on
PM Narendra Modi
PM Narendra Modi

तांबे या धातुपासून बनवण्यात आलेल्या या विशालकाय अशोक स्तंभाचे वजन तब्बल 9500 किलो इतके आहे. तर त्यांच्या आधारासाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलची आधारभूत रचना देखील तयार करण्यात आली आहे.

Central Vista Project
Central Vista Project

नवीन संसद भवनाच्या छतावरील अशोक स्तंभाचे प्रतीक आठ टप्प्यांच्या प्रक्रियेनंतर तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modiसंसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामावर आणखी 200 कोटी रुपये खर्च होऊ शकतात. स्टील, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कामांवर हा खर्च वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे

Central Vista Project
Central Vista Project

जानेवारीमध्ये केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD) संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या खर्चात वाढ करण्यासाठी लोकसभा सचिवालयाकडे मंजुरी मागितली होती. या वाढीनंतर संसद भवनाचे बजेट 1200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

2020 मध्ये, नवीन संसद भवन बांधण्याचा प्रकल्प टाटा प्रोजेक्ट्सकडून 971 कोटी रुपये प्राप्त झाला.

Central Vista Project
Central Vista Project

सरकारने या इमारतीसाठी ऑक्टोबर 2022 ची अंतिम मुदत निश्चित केली होती आणि यावर्षी संसदेच्या नवीन इमारतीत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com