महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६५ वी पुण्यतिथी आहे. आजच्या दिवसाला महापरिनिर्वाण दिवस म्हणूनही ओळखले जाते.
महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
Published on

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. तर 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना 'भारतीय संविधानाचे जनक' म्हणूनही ओळखले जाते. बाबासाहेबांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा तर दिलीच, पण देशभरातीलअस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीत मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात त्यांना खूप भेदभावाला सामोरे जावे लागले. तेव्हाच त्यांनी या दुष्टाईतून समाजाची सुटका करण्याचा निश्चय केला होता.

बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव आंबवडेकर होते. पण त्यांच्या गुरूंनी आणि शिक्षकांनी त्यांना प्रेमाने 'आंबेडकर' असे टोपणनाव दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येताच भारतीय संविधानाचा उल्लेख आपोआप येतो. संपूर्ण जगात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे. याशिवाय भेदभाव करणाऱ्या जातिव्यवस्थेवर कठोर टीका करणारे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणारा योद्धा म्हणून स्मरण करते.

वयाच्या 15 व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नऊ वर्षांच्या रमाबाईंशी विवाह झाला. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाबाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. त्यांनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.

मॅट्रिक पास करणारे बाबासाहेब आंबेडकर हे पहिले दलित होते. त्याचबरोबर परदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट करणारेही ते पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकार म्हणूनही ओळख होती. त्यांनी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), प्रबुद्ध भारत (१९५६) अशा अनेक वर्तमानपत्रे सुरु केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 1947 मध्ये पहिले कायदा व न्याय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिला हक्क विधेयक फेटाळल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मध्य प्रदेश आणि बिहारच्या विभाजनाची कल्पना सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. त्यानंतर 1912 मध्ये राज्यांची निर्मिती झाली.

बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कामाचे तास 14 वरून 8 तासात बदलले. 1942 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या 7 व्या सत्रात आंबेडकरांनी भारतातील कामाचे तास 14 वरून 8 तास केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध अनेक मोहिमा चालवल्या होत्या. याशिवाय सार्वजनिक ठिकाणे, पाणवठे आणि चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठीही त्यांना सत्याग्रह करावा लागला. या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती. 'आम्हीही माणसे आहोत' हे जगाला ठणकावून सांगण्यासाठीचा लढा होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935-36 मध्ये 'वेटिंग फॉर अ व्हिसा' नावाचे 20 पानांचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाने पाठ्यपुस्तक म्हणून वापरले आहे.

आपल्या मृत्यूच्या तीन दिवस आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हस्तलिखित पूर्ण केला. आंबेडकरांना मधुमेहाचा (शुगर) आजार होता. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com