जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये दोघांनीही अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांना रिसेप्शन पार्टी दिली. टीना-प्रदीप यांच्या रिसेप्शनला सामाजिक आणि राजकारणाशी संबंधित अनेक लोक उपस्थित होते.
लग्नादरम्यान दोघांनी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर विवाहाचे सर्व विधी पार पाडले. टीना दाबी आणि प्रदीप गावंडे लग्नाच्या वेळी अगदी साध्या लूकमध्ये दिसले. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते.
लग्नसोहळ्यानंतर शुक्रवारी झालेल्या काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित रिसेप्शन पार पडले. या सोहळ्यात दोघांनीही मरुन रंगाचे पोषाख परिधान केले होते
गेल्या अनेक महिन्यांपासून टीना दाबी या प्रदीप गावंडेसोबतच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर टीना आणि प्रदीप यांनी लग्नगाठ बांधत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला
2015 UPSC टॉपर आणि IAS टीना दाबी यांचे हे दुसरे लग्न आहे. तर त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या IAS प्रदीप गावंडे यांचे हे पहिले लग्न आहे. यापूर्वी टीनाचे लग्न आयएएस अतहर आमिर खानसोबत झाले होते. मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला.
प्रदीप हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर प्रदीप यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले. त्यानंतर दिल्लीच्या अनेक उच्च रुग्णालयात काम केले. नंतर त्यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला.
टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांची वैद्यकीय विभागात पोस्टिंगदरम्यान भेट झाली. त्याचवेळी या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.