History of Shivsena Bhavan : चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं शिवसेना भवन कसं आहे? पाहा फोटो...

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवनाची स्थापना केली होती.
Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama
Published on
Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

जून 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर आठ वर्षांनी मुंबईतील सर्वात गजबजलेल्या दादरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1974 साली शिवसेना भवनाची स्थापना केली.

Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

शिवसेना भवन उभारण्यात आले तेव्हा कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहण्यासारखा होता. या शिवसेना भवनाच्या उभारणीसाठी हजारो छोट्या-मोठ्या कामगारांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

मुंबईतील काही प्रसिद्ध इमारतींप्रमाणेच शिवसेना भवनही आपल्या अनोख्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मुख्य केंद्र व्हायला वेळ लागला नाही. युतीच्या काळातही याच शिवसेना भवनात भाजप आणि शिवसेनेच्या अनेक राजकीय बैठका झाल्या आहेत.

Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

शिवसेना भवन हे केवळ मुंबईतील मोठ्या राजकीय उलथापालथींचेच नव्हे तर अनेक मोठ्या घटनांचेही साक्षीदार राहिले आहे. 1993 मध्ये मुंबईत एका पाठोपाठ 13 बॉम्बस्फोट झाले. यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.

Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

त्यानंतर शिवसेना भवनाजवळही स्फोट झाला. ही इमारत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यानंतर इमारतीचे मोठे नुकसान झाले. काही वर्षांनी शिवसेनेच्या इमारतीची बरीच डागडुजी करण्यात आली.

Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

त्यानंतर जुलै 2007 मध्ये शिवसेनेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले भाषण आजही शिवसैनिकांच्या लक्षात आहे.

Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

शिवसेना भवनाने आजतागायत अशा एक ना अनेक घटनांचे पाहिल्या आहेत. पण राज्यात आठ-नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या महासत्तांतरानंतर शिवसेनेत दोन गट पडलेत.

Shivsena bhavan, Mumbai
Shivsena bhavan, Mumbai Sarkarnama

शिवसेना भवनापासून शिवसेनेच्या राज्यभरातील शाखा ताब्यात घेण्यावरुन दोन्ही गटात मोठा चढाओढ सुरु झाली आहे.पक्षचिन्ह आणि नावावरुन दोन्ही गटात मोठा असंतोष आहे. आता या सर्व गोंधळात कोणत्या गटाला काय मिळणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com