राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली 26/11 च्या शहिदांना श्रद्धांजली

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुबंईकरांच्याच नव्हे तर संपुर्ण भारतीयांसाठी काळा दिवस ठरला. याच दिवशी पाकिस्तांनी दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये एक दोन नव्हे तर ८ ठिकाणी दहशतवादी कारवाया करत मुंबईला ओलीस ठेवले होते.
राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली 26/11 च्या शहिदांना श्रद्धांजली
Commissionerate of Police, Mumbai Mumbai Police/ Twitter
Published on

मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस व अन्य सुरक्षा दलातील वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयात जाऊन मानवंदना दिली. तसेच स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून १३ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना श्रद्धांजली वाहिली.


मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस शूरवीरांना आज मुंबई पोलीस आयुक्तालय प्रांगणातील शहिद स्मारक येथे मानवंदनेसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुष्पचक्र अपर्ण करून आदरांजली वाहिली.

26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलिसांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in