एकेकाळचे मित्र आता बनले राजकीय शत्रू

राजकारणात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. इथे ना मैत्री कायम असते ना शत्रुत्व. भारतीय राजकारणात अशी अनेक नावे असली तरी जे पूर्वी खूप चांगले मित्र होते. आज ते एकमेकांचे कट्टर विरोधी बनले आहेत. अशी काही नावे जाणून घेऊया.
एकेकाळचे मित्र आता बनले राजकीय शत्रू
Published on
lalu prasad yadav- Nitish kumar
lalu prasad yadav- Nitish kumar

या यादीत लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांची नावे प्रमुख आहेत. दोघेही शालेय जीवनापासूनच एकमेकांचे जीवलग मित्र होते. पण राजकारणाने दोघांना एकमेकांचे कट्टर विरोधक बनवले आहे.

kumar vishwas- arvind kejariwal
kumar vishwas- arvind kejariwal

कवी कुमार विश्वास आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अण्णा आंदोलनाच्या काळापासून चांगले मित्र होते. आता दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत.

sonia gandhi - jaya bacchan
sonia gandhi - jaya bacchan

सोनिया गांधी भारतात आल्या तेव्हा जया बच्चन यांच्या घरी राहायच्या. दोघींमध्ये घट्ट मैत्री होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबात दरी पडली. आज या दोघीही राजकारणात एकमेकींच्या कट्टर विरोधक आहेत.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातही खूप जवळीक होती. 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही मैत्री तुटली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in