पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण; पहा फोटो

काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पुनर्बांधणीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी (13 डिसेंबर) वाराणसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
Published on
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. यासाठी आज सकाळीच विमानतळावर पोहचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.

काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

पंतप्रधान मोदींनी प्रथम गंगा नदीच्या काठावर ललिता घाटापर्यंत प्रवास केला आणि नंतर गंगेत स्नान केले.

काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

आज दुपारी 1 च्या सुमारास पंतप्रधान श्री काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले आणि त्यांनी पूजा केली. तसेच त्यांनी कालभैरव मंदिरात पूजा केली.

काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुमारे 339 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण करण्यात आले. या मेगा प्रोजेक्टमुळे वाराणसीतील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

यावेळी "आम्ही काशीच्या सर्व बांधवांसह बाबा विश्वनाथांच्या चरणी नतमस्तक होतो. काशीत प्रवेश करताच आपण सर्व बंधनातून मुक्त होतो, असे आपल्या पुराणात म्हटले असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.

काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिर पुर्नबांधणीतील बांधकामाशी संबंधित कामगारांसोबत जेवण केले.

काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अलकनंदा क्रूझमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ललिता घाटापासून रविदास घाटाकडे रवाना झाले.

काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील रविदास घाटावरील संत रविदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com