कोरोनाचे वास्तव मांडणाऱ्या दानिश सिद्दीकी यांचा मरणोत्तर पुलित्झर पुरस्काराने सन्मान

अमेरिकेतील सर्वात मोठा पुलित्झर पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यात भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांना यंदाचा मरणोत्तर पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबान्यांनी त्यांची हत्या केली.
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Published on
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

दानिश सिद्दीकी आणि त्यांचे सहकारी अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू आणि अमित दवे यांना भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे फोटो काढण्यासाठी सन्मानित करण्यात आले. कोरोना महामातील वास्तव आपल्या कॅमेऱ्यातून मांडणाऱ्या दानिश सिद्दीकी यांनी अनेक हृदयद्रावक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

15 एप्रिल 2021 रोजी नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात दिल्लीतील लोक नायक जय प्रकाश (LNJP) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेताना दानिश यांनी ह फोटो काढला.

Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

दिल्लीतील स्मशानभूमीत पुरेशी जागा नसल्यामुळे मृतदेहांवर पार्किंगमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी दानिश सिद्दीकी यांनी टिपलेले छायाचित्र

Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

29 एप्रिल 2020 रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीत कोरोनामुळे मरण पावलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्याचे दफन करण्यापूर्वी एका आरोग्य कर्मचाऱ्याची झालेली अवस्था दानिश यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहे.

Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

हा फोटो 24 एप्रिल रोजीचा नवी दिल्लीतील स्मशानभूमीचा आहे. यामध्ये लोक कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत.Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

Danish Siddiqui
Danish Siddiqui

4 मे - नवी दिल्लीतील स्मशानभूमीत दानिश यांनी हा फोटो घेतला. यामध्ये कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील सदस्य आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत.

Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

24 एप्रिल - गाझियाबादमधील गुरुद्वाराजवळ मनोज कुमार कारमध्ये त्यांची आई विद्या देवी यांच्या शेजारी बसले असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ा

Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

28 एप्रिल- नवी दिल्लीतील स्मशानभूमीत अभिषेक भारद्वाज आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर उभे होते.

Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

29 एप्रिल- नवी दिल्लीतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वॉर्डमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असताना ऑक्सिजन मास्क घातलेला डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करतानाचा हा क्षण दानिश यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला.

Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer
Danish Siddiqui Wins 2nd Pulitzer

दानिश सिद्दीकी आणि त्यांच्या टीमला 2018 मध्येही उत्कृष्ट कार्यासाठी पहिला पुलित्जर पुरस्कारही मिळाला होता. दानिश सिद्दीकी यांनी आपल्या छायाचित्रांमध्ये म्यानमारमधील रोहिंग्या निर्वासितांची समस्या दाखवली होती. ही छायाचित्रे पाहून लोकांना रोहिंग्यांवरील संकटाच्या गांभीर्याचा अंदाज आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com