भगतसिंह कोश्यारींनी घेतले केदारनाथाचे दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२० ऑक्टोबर) उत्तराखंड येथील पवित्र तीर्थस्थान केदारनाथ मंदिर येथे भेट देऊन भगवान केदारनाथाचे दर्शन घेतले.
Bhagata singh Koshyari
Bhagata singh Koshyari Sarkarnama
Published on
Bhagata singh Koshyari
Bhagata singh Koshyari Sarkarnama

या वेळी भगतसिंग कोश्यारी यांनी यात्रेकरुंना शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिल्या.

Bhagata singh Koshyari
Bhagata singh Koshyari Sarkarnama

ऑगस्ट महिन्यातही भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनच्या दौऱ्यावर आले होते. मात्र त्यावेळी त्यांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या राज्याच्या विमानावरुन राजकीय वातावरण तापले होते. माजी मुख्यमंत्री या नात्याने ते अद्यापही उत्तराखंड राज्याचे विमान येण्याजाण्यासाठी वापरत असल्याने त्यांच्यावर विरोधी पक्षाने टिका केली होती.

Bhagata singh Koshyari
Bhagata singh Koshyari Sarkarnama

महाराष्ट्र शासनाने राज्याच्या राज्यपालांना हेलिकॉप्टर किंवा विमानसेवा उपलब्ध करुन दिली नव्हती. त्यावेळीही भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला येणार होते, परंतु या प्रकरणामध्ये राजकारण तापू नये, त्यामुळे राज्यपालांनी त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता.

Chief Minister Pushkar Singh Dhami
Chief Minister Pushkar Singh Dhami

दरम्यान हवामान खात्याने दोन दिवसांचा हाय अलर्ट दिल्यानंतर उत्तराखंडमधील जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केदारनाथ यात्रेवर तात्पुरती बंदी घातली होती. सोनप्रयाग येथे यात्रेकरूंना थांबविण्यात आले होते. तसेच, त्यांना सुरक्षित ठिकाणी हवलण्यात आले.

Kedarnath
Kedarnath

आयएमडी'ने 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी रेड अलर्टचा इशारा दिला होता. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चार धाम यात्रेवर येणाऱ्या यात्रेकरुंना आपली यात्रा काही दिवसांसाठी स्थगित करण्याचे आवाहन केले होते.

Kedarnath
Kedarnath

तर आजपासून मुसळधार पावसामुळे थांबलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीत झाली आहे. हवामान सामान्य झाल्यामुळे यात्रा पुन्हा नव्याने सुरु झाली. केदारनाथ धाम यात्राही बुधवारपासून सुरू झाली आहे. मात्र, बद्रीनाथ महामार्ग बंद झाल्याने सध्या बद्रीनाथ यात्रा सुरू होऊ शकली नाही.

Kedarnath
Kedarnath

यमुनोत्री-गंगोत्री धाम यात्रा मंगळवारपासून सुरू झाली. मात्र खराब हवामानामुळे चारधाम यात्रा थांबवण्यात आली होती. बद्रीनाथ महामार्ग न उघडल्याने जोशीमठ आणि पिपलकोटीमध्ये तीन-चार दिवस थांबलेले तीर्थयात्री बुधवारी परतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com