आज देहूतल्या पवित्र भूमीवर येण्याचे भाग्य मिळाले. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही आहे. संत तुकाराम महारांजांच्या पालखी मार्गी तीन ट्प्प्यात, आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग पाच टप्प्यात होणार, ३५० किलोमीटरचा पालखी मार्ग, ११ हजार कोटींचा निधीची तरतुद कऱण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
देहूत जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदीराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत आले. यावेळी ते बोलत होते. सर्व वारकरी संतांच्या चरणी माझे कोटी कोटी वंदन असे म्हणत त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. तुकोबारायांची मुर्ती, पगडी, उपरणं, तुळशीच्या हार, संजीवन समाधीची प्रतिकृती देऊन व्यासपीठावर पंतप्रधानांचा सन्मान करण्यात आला. मंदीरात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी तुकोबांसमोर नतमस्तक झाले.
'संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून जगाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचं काम केलं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. हिंदू धर्मासाठी संत तुकोबारायांचं मोठ योगदान असल्याची भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
वाचा, काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे खासदार गिरीश बापट नरेंद्र मोदीचे पुणे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरमधून देहूकडे रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी शिळा मंदीर तसेच इंद्रायणी नदी तसेच या संपूर्ण परिसराची पाहणी केली.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''मनुष्यजन्मातील दुर्लभ संतांचा सत्संग असतो असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. संतांची कृपा झाली, तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज देहू या पवित्र तीर्थक्षेत्री येताना मलाही असेच वाटत आहे. देहूतलं मंदीर हे भक्तीचं मंदीरच नाही तर शक्तीचंही मंदीर आहे. भारत संतांची भूमी आहे.
'देहूचे शिला मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार व्यक्त करतो. तुकोबारायांची शिळा हे भक्ती आणि आधाराचं केंद्र आहे. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संत परंपरेला, भारतातील ऋषीमुनींना.'
''भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात आपल्या देशाला आणि समाजाला दिशा देण्यासाठी कुठला ना कोणता तरी महान आत्मा अवतरला आहे. आज देशभर संत कबीरदासांची जयंती साजरी होत आहे. संत तुकाराम महाराजांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या 'अभंगां'च्या रूपात अजूनही आहे. या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जी कधीही भंग होत नाही, ती शाश्वत आणि अखंड असते.
संताची ऊर्जा देशाला कायम गती देत असते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली तेव्हा ते तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत असत. आपली राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आज आपली आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.