कृषी कायदे- लढा, हिंसाचार आणि केंद्राची माघार

केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. मात्र गेल्या वर्षभरापासून या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शीखांचे पहिले गुरू गुरूनानक जयंतीच्या दिवशी मोदींनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.
कृषी कायदे- लढा, हिंसाचार आणि केंद्राची माघार
Farmers Protest
Published on
Farmers Protest
Farmers Protest

मात्र, हे कायदे लागू केल्यापासून देशभरातील शेतकऱ्यांम्ध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. केंद्रसरकारने हे कायदे मागे घ्यावेत यासाठी गेल्या वर्षभरात अनेक आंदोलने झाली, बैठका झाल्या, अनेक ठिकाणी हिंसाचार झाले, इतकेच नव्हे तर शेकडो शेतकऱ्यांनी यासाठी आत्महत्याही केल्या.

Farmers Protest
Farmers Protest

सप्टेंबर २०२० मध्ये अंमलात आलेल्या या कृषी कायद्यांना पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होता. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यासाठी 25 नोव्हेंबर 2020 पासून पंजाब, हरियाणातील लाखोच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमांवर धडकले.

Farmers Protest
Farmers Protest

देशभरातून या कृषी कायद्यांना शेतकऱ्याचा विरोध होता. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातही या आंदोलनाचे वारे वाहू लागले. महाराष्ट्रातही 21 डिसेंबर 2020 पासून नाशिकमधून आंदोलनाला सुरूवात झाली. राज्यातून 5 हजार शेतकरी दिल्लीकडे कूच झाले. अखिल भारतीय किसान सभेसह अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. सुमारे 500 वाहनांमधून हे आंदोलक दिल्लीला धडकले.

Farmers Protest
Farmers Protest

दिल्लीच्या सीमेपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हायवे शेतकऱ्यांनी बंद केले. हायवेवरच ट्रक, ट्रॅक्टर्स उभे केले, तंबू रोवले गेले. पंजाबमधील 30 शेतकरी संघटनांसह, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि देशातील इतर शेतकरी संघटना मिळून जवळपास 400 संघटना या शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या.

Farmers Protest
Farmers Protest

सुमारे एक लाखाहून अधिक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर विविध ठिकाणी आंदोलन करत होते. देशभरातून या आंदोलनाला बळ मिळत होतं. शेतकरी ऊन, पाऊस, वाऱ्यात तहान भुक हरपून या आंदोलनात सहभागी होत होते. अनेकदा या आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. मात्र, दिल्ली सीमेवरचा शेतकरी हटला नाही.

Farmers Protest
Farmers Protest

अखेर एक दिवस शेतकरी आंदोलन विकोपाला गेले. काही राज्यातील निवडणुकांमध्ये शेतकरी आंदोलकांनी सरकारविरोधी भूमिका घेत सभांचं आयोजन केलं. या आंदोलनाच्या नेतृत्वारून अनेक वाद उफाळून आले.

Farmers Protest
Farmers Protest

शेतकरी आंदोलना दरम्यान सर्वात मोठा हिंसाचार झाला तो 26 जानेवारी 2021 रोजी. 26 जानेवारी 2021 शेतकरी आंदोलनाचा एक भाग म्हणून ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. खरंतर या ट्रॅक्टर रॅलीला परवानगीच नव्हती. पण तरीही शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. शेतकरी इतके दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. पण या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलन शेतकऱ्यांनी बॅरिकेडस् तोडत दिल्लीत प्रवेश केला.

Farmers Protest
Farmers Protest

काही आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वज फडकावला. याच दरम्यान मोठा गदारोळ झाला, वाहनांची तोडफोड झाली, पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. अनेक पोलीस या हल्ल्यात जखमी झाले. दिल्लीतला झालेला हा हिंसाचार नियोजित कट असल्याचं सोशल मिडीयातून पसरवण्यात आलं.

‘ट्रॅक्टर रॅली’दरम्यान लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसाचारासाठी पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धू याचे मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आले. दिल्ली हिंसाचारानंतर तो फरार होता. मात्र, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दीप सिद्धू आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना नियोजित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर नेत त्यांना चिथावणी दिल्याची माहिती तपासात समोर आली.

Farmers Protest
Farmers Protest

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर मोठे खिळे ठोकले. सिमेंटच्या भिंती उभारल्या. मात्र, खिळे ठोकलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आणि जगभरातून मोदी सरकारवर टिकेचा वर्षाव सुरु झाला. अखेर पोलिसांना माघार घ्यावी लागली. हे ठोकलेले खिळे काढावे लागले. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिल्लीच्या या खिळे ठोकलेल्या जागेवरच फुलं लावणार असल्याची घोषणा केली.

Farmers Protest
Farmers Protest

लाल किल्ल्यानंतर शेतकरी आंदोलनादरम्यान झालेला दुसरा मोठा हिंसाचार म्हणजे लखीमपूर खीरी येथे घडलेला हिंसाचार. 3 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 4 शेतकरी होते.

Farmers Protest
Farmers Protest

त्यानंतरही हिंसाचाराचे हे सत्र थांबले नाही. 14 ऑक्टोबर 2021 रोजी शेतकरी आंदोनातील एका तरुणाची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली. सिंधू-बॉर्डरवर एका तरुणाचा हात कापून त्याचा मृतदेह बॅरिकेड्सला लटकावण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे त्याची हत्या करण्यापूर्वी त्याला अत्यंत क्रूरपणे छळण्यात आल्याचही शवविच्छेदन अहवातून समोर आल होतं.

Farmers Protest
Farmers Protest

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्या मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. शेतकरी आंदोलनाचा पट असा गंभीर आहे. आता मात्र मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळं गेले वर्षभर सुरु असलेलेल हे आंदोलन काही प्रमाणात थांबेल, आणि आंदोलनातील संघर्ष, हिंसाचार थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Farmers Protest
Farmers Protest

अखेर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आज 19 नोव्हेंबर 2021 या दिवशी म्हणजेच आंदोलनाच्या वर्षपूर्तीला फक्त 5 दिवस शिल्लक असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. शेतकऱ्यांनी मोदींच्या घोषणेनंतर आनंद व्यक्त केला. पण आंदोलन आत्ताच मागे न घेण्याच घोषणाही करण्यात आली. महिनाअखेर सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात संसदेत कायदे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिवसापर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in