वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू, पहा फोटो

नववर्षाच्या पूर्वसंध्येला वैष्णोदेवी (vaishno devi mandir) माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झाले आहेत.
वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू, पहा फोटो

vaishno devi mandir

Published on

vaishno devi mandir

vaishno devi mandir

प्राथमिक तपासानुसार या घटनेची सुरुवात वादातून झाली होती. त्यानंतर लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की सुरू केली. त्यामुळे तेथे चेंगराचेंगरी झाली. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

vaishno devi mandir

vaishno devi mandir

या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चेंगराचेंगरीत किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

vaishno devi mandir

vaishno devi mandir

घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार आहे.

vaishno devi mandir

vaishno devi mandir

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 2 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

vaishno devi mandir

vaishno devi mandir

या घटनेची माहिती देताना गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका भाविकाने कटरा येथे सांगितले की, रात्री एकच्या सुमारास अनियंत्रित गर्दीमुळे ही घटना घडली. मंदिराच्या आवारात जास्त गर्दी होत असल्याचे अधिकाऱ्यांना माहीत होते, तर त्यांनी यात्रा का थांबवली नाही, यात्रा वेळीच थांबवली असती तर ही दुर्घटना घडली नसती'.

vaishno devi mandir

vaishno devi mandir

मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, उधमपूरचे खासदार डॉ जितेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी बोललो आहे. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०, ००० रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

vaishno devi mandir

vaishno devi mandir

वैष्णो देवी मंदिर हे जम्मूच्या रियासी जिल्ह्यात ५,२०० फूट उंचीवर असलेले गुहेतील मंदिर आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवीच्या मंदिरात हजारो भाविकांची गर्दी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.