ashok chavan and nanded corporation | Sarkarnama

अशोक चव्हाणांना भाजपच्या फेसबुकने केले निरुत्तर

सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नांदेड : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या खात्याबद्दलच्या बातम्या कॉंग्रेस नांदेड या आपल्या पेजवर टाकणाऱ्या नांदेड कॉंग्रेस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने त्यांच्या प्रचारासाठी उघडलेल्या फेसबुक बेजवरील आरोपांना समर्पक उत्तर देता आले नाही. भाजपच्या निवडक प्रश्‍नांना आणि नांदेडला केले भकास या कॅचलाईनपुढे अशोक चव्हाण आणि कॉंग्रेस चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अद्याप चाचपडत आहे. 

सोशल मिडीयात फेसबुक पेज सुरू करून भाजपने अशोक चव्हाण यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. नांदेडकरांनी दिलेल्या सत्तेचा काय वापर केला असा थेट सवाल करत भाजपच्या पेजवरून अशोक चव्हाणांना चांगलेच अडचणीत आणले गेले आहे. इथल्या जनतेनं तुम्हाला सगळं दिलं, तुम्ही काय दिलं असे थेट विचारत, "ना उद्योग ना विकास नांदेड केलं भकास ' या कॅचलाईनखाली अशोक चव्हाणांच्या नांदेड महापालिकेतल्या वीस वर्षाच्या सत्तेचा चांगलाच पंचनामा केला आहे. नांदेडला कुठले नवे उद्योग आले महापालिकेचं बजेट कोट्यवधींचं आणि शहरातली वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता तशीच का असे अनेक प्रश्‍न आणि विविध समस्या व्यंगचित्राद्वारे या पेजवर टाकून चव्हाण यांना भाजपने चांगलेच निरुत्तर केलं आहे.