मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

मंगळवार, 4 जुलै 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा केली. 'राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांना चांगले पीक येऊ दे,' अशी प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीच्या चरणी केली! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी काम करण्याची शक्तीही यावेळी त्यांनी पांडुरंगाकडे मागितली. या वेळी त्यांच्यासमवेत यंदाच्या महापूजेचे मानाचे वारकरी बुलढाणा जिल्ह्यातील बाळसमुद्र (ता.सिंदखेडराजा) येथील श्री परसराम मेरत व त्यांच्या पत्नी अनुसयाताई याही होत्या.‬ याच महापूजेतील हे काही क्षण.... 