Igatpuri Lead will take Samir Bhujbal to Victory Say Nirmala Gavit | Sarkarnama

इगतपुरीतील मतांची आघाडी समीर भुजबळांना विजयाकडे नेईल : आमदार निर्मला गावित 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 16 मे 2019

''इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी यंदाच्या निवडणुकीत खुप मेहनत घेतली आहे. प्रत्येक गाव व शहरातील प्रभागांत आम्ही विकासकामांच्या निमित्ताने पोहोचलेलो आहोत. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मोठी आघाडी मिळेल. ही आघाडी आमचे उमेदवार समीर भुजबळांना निसंशय विजयाकडे नेतील," असा विश्‍वास कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावीत यांनी व्यक्त केला. 

इगतपुरी : ''इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी यंदाच्या निवडणुकीत खुप मेहनत घेतली आहे. प्रत्येक गाव व शहरातील प्रभागांत आम्ही विकासकामांच्या निमित्ताने पोहोचलेलो आहोत. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मोठी आघाडी मिळेल. ही आघाडी आमचे उमेदवार समीर भुजबळांना निसंशय विजयाकडे नेतील," असा विश्‍वास कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावीत यांनी व्यक्त केला. 

आमदार गावीत म्हणाल्या, ''इगतपुरी विधानसभा मतदारसंघात २०१४च्या लोकसभा निवडणूकीत देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ यांना आघाडी होती. या मतदारसंघात दोन्ही कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत अतिशय चांगला समन्वय होता. आम्ही सगळे एकदिलाने प्रचारात उतरलो होतो. त्यामुळे शविसेना- भाजप युती अथवा अन्य उमेदवार काहीही दावा करीत असले तरीही त्यांचा मोठा भ्रमनिरास होईल. मतदारसंघात इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्‍वर शहर, हरसुल आणि तालुक्‍यातील गावांत मोठ्या प्रमाणात शेतकरी व आदिवासी समाज जागरुक झाला होता. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पालकमंत्री असतांना मंजुर झालेली कामे मोठ्या प्रमाणात आम्ही. मतदारसंघात आमदार म्हणून आम्ही प्रत्येक गावात कोणताही भेदभाव, राजकारण न करता विकासाची कामे केलेली आहेत. मतदारांना त्याचा अनुभव आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना अतिशय चांगले मतदान झालेले आहे. या जोरावर आमचा उमेदवार निश्‍चितच किमान वीस हजार मतांची मोठी आघाडी घेईल. ही आघाडी त्यांना विजयाकडे घेऊन जाईल.''

''शिवसेना, भाजप युतीच्या नेत्यांकडे इगतपुरी मतदारसंघासाठी प्रचाराचा मुद्दाच नव्हता. गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांनी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समृध्दी महामार्गाच्या सक्तीच्या भुसंपादनाने लोक नाराज आहेत. आदिवासी समाजाची राज्य सरकारच्या आरक्षण धोरणामुळे कोंडी झाली आहे. त्र्यंबकेश्‍वर भागात गाजावाजा खुप झाला मात्र तेथील विकासाची कामे ठप्प आहेत. हरसुल भागात गेल्या पाच वर्षात सत्ताधारी पक्षाचे लोक फारसे काहीच करु शकले नाहीत. त्याच्या नाराजीचा फटका शिवसेनेला बसेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी शुप मेहेनत घेतल्याने आम्हाला निश्‍चितच आघाडी मिळेल. या आघाडीने युतीला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.'' असेही त्या म्हणाल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख