IFS dnyaneshwar mule may be join politcis on 6 november | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या लोकसभा उमेदवारीचा निर्णय 6 नोव्हेंबरला?

संपत मोरे
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

अनेक वर्षापासून ज्या कुस्तीची चर्चा सुरु आहे, ती कुस्ती राजकीय आखाडयात बघायला मिळणार आहे. 

पुणे : खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यासाठी ज्या पैलवानाची चर्चा होतेय, ते परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे याखेपेस नक्की हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरतील, अशी शक्‍यता आहे. या विषयाबाबत खुद्द मुळे यांनीच "मी सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बोलेन', असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते जे काही बोलतील ते त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भात असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अलीकडच्या काही दिवसांत मुळे यांच्या भाषणातून राजकारणाचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपुर्वी पुण्यात त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आले होते. त्यावेळी त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा झाली होती. 

मुळे यांचं मूळ गाव अब्दुललाट. हे गाव हातकणगले मतदारसंघात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आसपास शेट्टी यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून मुळे यांच्या नावाची चर्चा होती, पण ती फक्त चर्चाच राहिली. आगामी लोकसभा निवडणुकीची पाश्वभूमी वेगळी आहे. बलदत्या राजकीय परिस्थितीत मुळे यांचं भाजपच्या नेत्यांवर प्रेम बसलं आहे. त्यामुळेच "सेवानिवृत्त झाल्यावर बोलू' हे त्यांचं विधानही बरंच काही सांगून जातं. महत्त्वाची बाब म्हणजे ते 5 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे ते 6 नोव्हेंबरपासून राजकीय विषयावर थेटपणे बोलू शकतात. त्यांच्या नावाचा विचार राजू शेट्टी यांच्या विरोधात प्राधान्याने होऊ शकतो. 

सध्या राजू शेट्टी यांच्याविरोधात सदाभाऊ खोत यांच्यासह काही नावे चर्चेत असताना मुळे यांच्या रूपाने एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा भाजपकडून दिला जावू शकतो. "माती पंख आणि आकाश'मध्ये त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा संघर्ष मांडला आहे. त्यांच्या संघर्षातून शेकडो तरुणांनी प्रेरणा घेतली आहे. आता पुन्हा एकदा मुळे राजकीय संघर्षासाठी सिद्ध होणार आहेत. या मतदारसंघात शेट्टी यांना रोखण्याची जबाबदारी भाजपकडून मुळे यांच्यावर सोपवण्यात येण्याची शक्‍यता आहे . त्यामुळे अनेक वर्षापासून ज्या कुस्तीची चर्चा सुरु आहे, ती कुस्ती राजकीय आखाडयात बघायला मिळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख