पोलिसांना मारहाणीच्या साताऱ्यात दहा घटना : SP सातपुते यांची आता शेवटची `वाॅर्निंग`

लॉकडाऊनच्या काळात शासकिय कामात अडथळा आणण्याचा व पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या जिल्ह्यात दहा घटना घडल्या आहेत.अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात या गोष्टीचे सर्वांनी खंडन करायला हवे. मी स्वतः या घटनांचा तीव्र निषेध करते, असे सातपुते यांनी सांगितले.
Satara Police
Satara Police

सातारा : पोलिस प्रशासन हे कोरोनाबाबत सातारकर नागरिकांत गांभीर्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. पाच टक्के लोकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याने ते बेजबाबदारपणे वागत आहेत. आतापर्यंत महिनाभरात पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याच्या दहा घडना घडल्या आहेत. या घटनांचा मी तीव्र निषेध करते. यापुढे कोणीही जिल्ह्यातील पोलिसांशी गैरवर्तणूक करून चुकीचे वर्तन करेल, तर त्याला त्याचा पश्चाताप होईल, अशी कारवाई आम्ही करू, असा इशारा साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी आज दिला आहे. 

सातारा शहरातील सदरबझार परिसरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी पोलिसांसोबत तैनात असलेल्या होमगार्डने मास्क का घातले नाहीस, असे विचारल्यावरून १५ जणांच्या जमावाने सदर होमगार्डला मारहाण केली होती.

या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. यापूढे कोणी शासकिय कर्मचारी किंवा पोलिसांशी दुरव्यवहार करेल तर त्याला पश्चाताप होईल. अशी कडक कारवाई करू, कसा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.  

तेजस्वी सातपुते म्हणाल्या, आज सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनला महिना पूर्ण झाला आहे. या कालावधीत सातारकर नागरीकांनी पोलिस व प्रशासनास चांगले सहकार्य केले आहे. पण अजूनही पाच टक्के लोक आहेत, त्यांना याबाबत गांभीर्य नाही. अशा सर्व बेजबाबदार नागरीकांवर कडक कारवाई कराव्या लागत आहेत. पोलिस प्रशासन नागरीकांत कोरोनाच्या संसर्गाबाबत गांभीर्य आणण्याचा प्रयत्न करत आहे.

लॉकडाऊनच्या काळात शासकिय कामात अडथळा आणण्याचा व पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या जिल्ह्यात दहा घटना घडल्या आहेत. अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात या गोष्टीचे सर्वांनी खंडन करायला हवे. मी स्वतः या घटनांचा तीव्र निषेध करते.  या घटनांतील सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांना कडक शिक्षेपर्यंत पोचविले जाणार आहे. असे प्रकार करणाऱ्यांना पाच ते दहा वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. असे अपराध घडत असताना साधी जखम झाली तर गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच यातून दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

पोलिस, आरोग्य विभाग तसेच इतर शासकिय विभागाचे कर्मचारी आपल्यासाठी सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उभे आहेत. त्यांना सहकार्य करण्याची भुमिका आपण सर्वांनी घ्यायला हवी. आगामी काळात शासकिय कर्मचारी अथवा पोलिसांशी दुरव्यवहार अथवा चुकीचे वर्तन करतील त्यांना नंतर नक्की पश्चाताप होईल, अशी कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. प्रशासनास सहकार्य करा आपल्या सुरक्षितेसाठी व सेवेसाठी सर्वजण रस्त्यावर उन्हात, धुळीत काम करतात. त्यांना सहकार्य करावे. यातूनच
कोरोनातून बाहेर पडणार आहोत.

पोलिस कर्मचाऱ्यांकडून आपल्याला चुकीची वागणूक मिळाली असेल तर थेट मला फोन करा अथवा अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावे. पण पोलिस कर्मचाऱ्यासोबत दूरव्यवहार सहन केला जाणार नाही, काठोर कारवाई केली जाईल. यामध्ये पाच ते दहा वर्षापर्यंतची शिक्षा होऊन तुमचे करिअर व आयुष्य उध्दवस्त होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com